गोळेगणी गावात विविध विकास कामांचे उद्घाटन मा. आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न

57

अवघ्या १५ दिवसात गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करून विकासकामांना पूर्णता दिल्याने गावकऱ्यांनी कामगार पक्षाचे आभार मानले

संदिप जाबडे
२० मार्च, पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गावात खोत भावकी सामाजिक सभागृह व पेवर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन अलिबाग विधानसभा मतदार संघाचे माझी आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते पार पडले. १५ दिवसांपूर्वी गोळेगणी ग्रामस्थांनी सामाजिक सभागृहाची मागणी शेकाप तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांच्याकडे केली होती. त्यानंतर गावातील मंदिरात बैठक घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसात सभागृहाचे काम पूर्ण केल्याने उपस्थित गावकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानले.

शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी आपल्या मनोगतात २०१० पासून २०२२ पर्यंत शेतकरी कामगार पक्षाने गोळेगणी गावात केलेल्या विकासकामांची माहिती आणि आठवण ग्रामस्थांना करून दिली. तर प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेल्या मा. आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांनी उपस्थित गोळेगणी वासियांना विविध जिल्हा परिषद योजनांविषयी विस्तृत स्वरूपात माहिती दिली. गोळेगणी गावात उद्घाटनासाठी आमंत्रित करून सत्कार केल्याने गोळेगणी ग्रामस्थांचे मा. आमदार पाटील यांनी आभार मानले.

आमच्यामुळेच काही लोक दिल्लीला गादीवर जाऊन बसले. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाची व्यथा मांडताना मा. आमदार पाटील यांनी आम्ही हा रस्ता बनवण्यासाठीच खासदार साहेबांना दिल्लीला पाठवलं परंतु रस्ता होत नाहीये याची कल्पना देखील उपस्थितांना करून दिली.
जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभार ह्या आमच्याकडे आल्या त्यावेळेस त्यांची इच्छा जिल्हा परिषद सदस्या होण्याची नव्हती पण त्या इतक्या हुशार आहेत की निवडून आल्यापासून त्यांनी १५ ते १८ कोटी रुपयांचा निधी पोलादपूर तालुक्याला आणल्याचे सांगितले.

आपल्या मनोगतात शेवटी आपले वडील रायगडचे भाग्यविधाते, रायगड जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत कुडपण चा रस्ता हा आपल्या वडिलांनी त्यावेळेस केल्याची आठवण उपस्थितांना करून दिली.

 

हे आपण वाचलंत का?

 

कार्यक्रमाला माझी आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभार, तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, ज्येष्ठ नेते बापू जाधव, बोरावळे ग्रामपंचायत सरपंच वैभव दिनकर चांदे, मोरगिरी ग्रामपंचायत सरपंच शरद जाधव, योगेश महाडिक, समीर चिपळूणकर, यासीन करबेलकर, अमजद करबेलकर, मनोहर पार्टे,उपसरपंच प्रकाश दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश मोरे, लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मोरे,दशरथ बा. मोरे,दिपक सुर्वे,शरद मोरे, मुंबई मंडळांचे सचिव विकास मोरे, विनोद मोरे, दिपक भा. मोरे, दिलीप मोरे, अजित भोसले,अनिल मोरे आदी उपस्थित होते.