राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा निर्णयाचे विरोधात निदर्शने…

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो.नं.- ९८६९८६०५३०

 मुंबई- १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता स्वामी नारायण मंदिर जवळ ,दादर स्टेशन समोर दादर पूर्व ,मुंबई येथे सरकारच्या खाजगीकरणाच्या,कंत्राटीकरणाच्या विरोधात भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघाच्या वतीने धरणे निदर्शने करण्यात आले.

शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता इत्यादी १३६ प्रकारची पदे बाह्य एजन्सिज मार्फत भरण्याचा निर्णय उद्योग, उर्जा आणि कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दिनांक १४ मार्च, २०२३. रोजी जाहीर करण्यात आला. यातील विविध पदे ही महिना २५०००/-, ५००००/- ते २०००००/- ( पंचविस हजार, पन्नास हजार ते दोन लाख पगाराची आहेत.) ही सर्व पदे भरण्याचे काँट्रॅक्ट (९) नऊ प्रायव्हेट कंपन्यांना पाच वर्षासाठी देण्यात आले आहे.

सदर बाब ही अत्यंत चुकीची आहे हे लक्षात घेऊन भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ यांच्या वतीने दादर रेल्वे स्टेशन च्या बाहेर स्वामी नारायण मंदिर च्या समोर तातडीने धरणे निदर्शने घेण्यात आले.संघटनेतील कार्यकर्ते , पदाधिकारी यांनी आपली भूमिका मांडत निषेध व्यक्त केला. संघटनेचे अध्यक्ष मा. अमोलकुमार बोधिराज सर यांनी भारतीय चळवळीचा इतिहास आणि कामगार चळवळीचा इतिहासाची मांडणी करत भारतीय संविधानाने दिलेले हक्क अधिकार शासन प्रशासन धुळीला मिळवत आहे शासनाने घेतलेला निर्णय तत्काळ मागे घ्यावा तसेच संविधानाची अमलबजावनी करण्यात यावी तसेच संघटनेच्या प्रमुख मागण्या माडण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे.

प्रमुख मागण्या

१)शासनाने बाह्य एजन्सिज द्वारा शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता इत्यादी १३६ प्रकारची पदे बाह्य एजन्सिस मार्फत भरण्याचा, खाजगीकरणाचा, कंत्राटीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

२) एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू करून सर्व भरती प्रक्रिया एम्प्लॉयमेंट एक्सचेंज द्वारेच करण्यात यावी.

३) शासकीय निमशासकीय व महामंडळे इत्यादी आस्थापनातील भरती ही विविध प्रवर्गाच्या आरक्षणानुसार शासनाच्या सेवेत करण्यात यावी.

सदर आंदोलनात विविध संघटना आणि संस्था बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय नागरिक म्हणून उपस्थिती दर्शवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here