नेरी केंद्रातील १३ गावात पायाभूत नव साक्षरता व संख्या ज्ञान मुल्य मापन परीक्षा संपन्न
केंन्द्र प्रमुख मा. नरेंन्द्र उरकूडे यांची परीक्षा केंद्राला भेट
नवसाक्षरांची १००% उपस्थिती
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील नेरी केंन्द्रात दिनांक १७ मार्च २०२४ रोजी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत व संख्याज्ञान चाचणीचे आयोजन पार पडले. यावेळी मुख्याध्यापक पर्यवेक्षक स्वयंसेवक तसेच नवसाक्षर उपस्थित होते.
*जि.प. उच्च प्राथमिक शाळा मांडेसर*
मोहाडी : मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रविवारी केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणीचे आयोजन करण्यात आले. पंधरा वर्षे व त्याहून अधिक प्रोढ वयोगटातील निरक्षर व्यक्तीमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करून त्यांचेत आर्थिक साक्षरता व कायदेशीर साक्षरता, डिजिटल साक्षरता, आरोग्य काळजी व्यवस्थापन,स्थानिक रोजगार पूर्व कुशलता व उच्च कौशल्य विकसित करून घेणे असे या चाचणी व कार्यक्रमाचे उद्देश होते.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर येथे एकूण ३० परीक्षार्थिनी परीक्षा दिली. यावेळी केंद्र संचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डी. के. माटे सर, तथा पर्यवेक्षक म्हणून नरेंद्र निंबार्ते सर , स्वयंम सेवक भवन लिल्हारे, कृष्णकुमार लिल्हारे, मयुरकुमार सव्वालाखे यांनी कामकाज पाहिले. यावेळी गट संसाधन केंद्र मेरी येथील विशेष शिक्षक नरेंद्र उरकुडे सर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
या परीक्षेला रविवारी दिनांक १७ मार्च २०२४ रोजी नवसाक्षरांनी १००% उपस्थिती दर्शवली हे खास यावेळी नवसाक्षर सौ. जाईकला लिल्हारे, जयवंता लिल्हारे, रुखवंता लिल्हारे , पारबती बावणे, कलाबाई नान्हे, पूर्णा सव्वालाखे, बेबी खडसे, तारा बशिने, इंदुबाई दमाहे,मिराबाई बच्छेरे, सुनंदा बशिने, सुर्मीला बशिने, सुंदर बशिने, सुनिता सव्वालाखे , कारंजाबाई सव्वालाखे, गिता सव्वालाखे, कलीता सव्वालाखे, सरिता सव्वालाखे, अलका लिल्हारे, ममिता लिल्हारे, यशोदा लिल्हारे, पार्बती लिल्हारे, उर्मीला नागपूरे, श्री. ढेकलनाथ बच्छेरे , नामदेव सव्वालाखे, चंद्रकिरण सव्वालाखे, राजीराम बोरकर, देवराम मुटकुरे , दिलीप खडसे, उदाराम लिल्हारे, यांची उपस्थिती होती.
जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे केंन्द्र संचालक मुख्याध्यापक मा. डी.के. माटे सर यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक मा. वनवास धनिस्कार, सैलेंद्र गजभिये, राजू बालपांडे, व्हि.एस. माटे व भोंगाडे मॅडम यांनी काम सांभाळले हे खास.
*केंन्द्र प्रमुख नरेंन्द्र उरकुडे यांची परिक्षा केंन्द्राला भेट*
उल्हास नवभारत साक्षरता पायाभूत व संख्या ज्ञान चाचणीचे जाँच पडताळणी नेरी केंद्रातील नरेंद्र उरकुरे सर यांनी केंन्द्रातील १३ शाळेला भेट देऊन पाहणी केली.
मा. नरेंन्द्र उरकुडे केंद्र प्रमुख नेरी यांनी पिंपळगाव, रामपूर, मांडेसर, टाकळी, भोसा, बीड, एकलारी, वरठी १, वरठी २ , सातोना, पाहुनी, पाचगाव, नेरी असे एकून १३ गावातील शाळेला भेट देऊन निरीक्षण केले. ह्यावेळी शाळेतील केंन्द्र संचालक डी. के. माटे,ममता खोब्रागडे, नामदेव टांगले , डी.जी. भुते, एल.झेड. ढोमणे, प्रकाश वैरागडे, जगदिश माटे, विरु इंगळे, निशीकांत बडवाईक , साधना जांभुळकर, आर. एस. मरघडे, भगींदर पोरब, स्नेहल पडोळे असे मुख्याध्यापक उपस्थित होते. तर पर्यवेक्षक म्हणून विजय जाधव , संतोष कारेमोरे, ज्योती लांडगे, ज्योती शेंडे, देवानंद दुबे, संगीता इंगळे , एम. एन. नेवारे, मंजू नामने, वर्षा बडोले , दिपाली भगे, वंदना फळक , अजीत मळावी यांची उपस्थिती होती. शाळेतील शिक्षकांनी स्वयंसेवकांच्या मदतीने १०० टक्के नवसाक्षरांची नोंदणी केल्याचे दिसून आले.