माणगाव तालुक्यात उबाठा गटाला दे धक्का ! टेमपाले मधील मुस्लिम बांधवांचा आ. गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेतप्रवेश
✍🏻 नंदकुमार चांदोरकर ✍🏻
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 89832 48048📞
माणगांव :-शिवसेना प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगांवचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासाच्या झंझावाताने आकर्षित होऊन विरोधी पक्षाची गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शिवसेनेत सुरु असलेल्या इनकमिंगचा हा सिलसिला दिवसेंदिवस वाढत असल्याने महाड मतदार संघात विरोधक औषधालाही शिल्लक राहणार नाहीत असे बोलले जात आहे. रविवार दि.१७ मार्च रोजी माणगांव तालुक्यातील टेमपाले येथील मुस्लिम बांधवांनी आमदार भरत गोगावले यांची कार्यप्रणाली आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना प्रवेशकर्त्यांनी आ. गोगावले यांनी विकास कामे करताना कधीही जात पात पाहिली नाही सर्व समाजाला त्यांनी समान न्याय दिला आहे त्यामुळे आम्हीही शिवसेनेच्या विकासाच्या या प्रवाहात सामिल होत असल्याचे सांगितले.
यावेळी आ. गोगावले यांनी मार्गदर्शन करताना अठरा पकड जातींना सोबत घेऊनच आपल्याला मतदार संघाचा विकास करायचा आहे असे सांगितले. गेल्या १५ वर्षात महाड मतदार संघात आपण एकही दंगल किंवा हिंदु मुस्लिम वाद होऊ दिला नाही. मतदार संघातील एकही वाडी अथवा मोहल्ला विकासा पासून वंचित राहणार नाही असे गोगावले यानी सांगितले.