आता MPSC ची परीक्षा होणार UPSC प्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी दिली विधान परिषदेत माहिती.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC ) राज्य सरकारच्या विविध पदांची भरती केली जाते. सरकारी अधिकारी होण्यासाठी राज्यभरातील युवक प्रयत्न करत असतात. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. आता आयोगाने राज्यातील परीक्षेचा क्रम या वर्षांपासून बदलला आहे. आता एम पी एस सी, ची परीक्षा यूपी एस सी, प्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या परीक्षे संदर्भात इतर महत्वाची माहिती त्यांनी सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली.
सन 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील. असे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद आमदार, शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि आमदार विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्रातील विध्यार्थी हा यूपी एसी सी सोबत एम पी एस सी ची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षांचा क्रम वेगळा असल्याने तो आता एकसंमान करण्यात येत आहे. त्याबरोबर एम पी एस सी ला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृती बंध्दाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरु आहे. यापुढे वर्ग 1, वर्ग 2,आणि वर्ग 3, ची पद भरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुर्न- रचना केली जाईल. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 12 नोव्हेंबर 2024 च्या पत्रान्वये 617 उमेदवारांची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर 540 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.व पुढील काळात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच
यूपी एस सी परीक्षेचा अभ्यास करून एम पी एस सी च्या पुनर रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.