गडचिरोली मध्ये अमेरिकेचा सकरमाउथ कॅटफिश आढळला..
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : गडचिरोली येथील कठानी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना मासा सापडला. हा दुर्मिळ मासा लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. काही वेळ त्याला पकडून ठेवल्यानंतर पुन्हा नदीत सोडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आढळणारी ही माशांची प्रजाती काही लोकांनी भारतात आणली होती. घरातील फिश टँकमध्ये ठेवून घराची शोभा वाढवण्यासाठी सकरमाउथ कॅटफिशचा वापर करायचे. मात्र, त्यानंतर या दुर्मिळ प्रजातीला नदीत सोडण्यात आले. त्यानंतर भारतातील गंडक, कोसी, गंगासारख्या नद्यांमध्ये हा मासा दिसू लागला.
सकरमाउथ कॅटफिश या माशाचे प्रजनन जास्त वेगाने होते. त्याचबरोबर इतर जलचरांसाठी हा मासा धोकादायक आहे. म्हणजेच इतर माशांची अंडी खाण्याबरोबरच दुसऱ्या माशांनाही ही प्रजाती भक्क्ष करते. त्यामुळं नदीत या मासा असणे धोकादायक मानले जाते.
या विचित्र माशाला चार डोळे आणि विमानासारखे पंख आहेत. हा मासा अॅमेझॉन नदीत आढळतो.