आमदारांच्या मध्यस्तीमुळे माथेरान बंद मागे,दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पर्यटकांची सेवा देण्यास सुरुवात
✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻माथेरान शहर प्रतिनिधी मो.8793831051
माथेरान :- मागील दोन दिवसापासून पर्यटकांच्या फसवणुकी विरोधात माथेरानकरांनी पुकारलेला माथेरान बंद स्थानिक आमदार यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आला.दस्तुरी येथे पर्यटकांची होत असलेली फसवणुकीसंदर्भात ठोस पावले उचलण्याच्या सूचना केल्यानंतर यावर माथेरानकरांचे समाधान झाले असल्याने 19 तारखेला दुपारी 4 वाजता सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले.मागील दोन दिवसांच्या बंद नंतर पर्यटकांना सेवा देण्यासाठी माथेरान सज्ज झाले आहे.
स्थानिक प्रशासनातील अधिकारी फसवणुकी संदर्भात कोणतंही ठोस पावले उचलत नसल्याने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदची हाक दिली होती.याबाबत आमदार महेंद्र थोरवे अधिवेशन सोडून माथेरानचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले.यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या उपस्थितीत 19 मार्चरोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात चर्चा आयोजित केली होती.यामध्ये अश्वचालक,माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती, टॅक्सी युनियनच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.यामध्ये प्रत्येक संस्थेचे म्हणणे ऐकून घेतले.याचर्चेत माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने येथील अधिकारी फसवणूकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवला.
सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर दस्तुरीवर पर्यटकांच्या माहितीसाठी काय काय उपाययोजना होतील यावर मंथन करण्यात आले.दरम्यान घोडेवाले गाडीच्या मागे धावतात ते बंद करण्यावर चर्चा झाली.दस्तुरी येथील मुख्य प्रवेशद्वारातूनच पर्यटकाना येऊ ध्यावे.या रस्त्यावर प्रवासी माहिती केंद्र सुरू करा तसेच एक अद्ययावत वेब साईट खोलून तिथे पर्यटकांना इत्यम्भूत माहिती द्या असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना आदेश दिले.दर पत्रकसंदर्भात प्रत्येक संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी एकत्र बसून समिती करावी जेणेकरून अश्वपालकांवर अन्याय होणार नाही.
दर महिन्याला आमदार याचा पूर्ण आढावा घेणार असून गरज भासल्यास माथेरान मध्ये येऊन याचा पाठपुरावा करणार.या चर्चासत्रात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे संयोजक कुलदीप जाधव,मनोज खेडकर,अजय सावंत,राजेश दळवी, आकाश चौधरी, प्रवीण सपकाळ, प्रदीप घावरे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी,हॉटेल असोसिएशन अध्यक्ष उमेश दुबल, नेरळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मंगेश म्हसकर स्थानिक अश्वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम,मूळवासीय अश्वपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे, टॅक्सी युनियन अध्यक्ष प्रवीण पोलकम , संतोष आखाडे तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग नोंदवला तर पोलीस प्रशासनाचे स.पो.नि अनिल सोनोने,तहसीलदार सुरेंद्रसिंग ठाकूर,वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम व अन्य अधिकारी उपस्थित होते.