यवतमाळ जिल्हातील पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील 10 व्हेंटीलेटर्स पडून आहे धूळखात.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.19 एप्रिल:- कोरोना वायरसच्या महामारीच्या या गंभीर परस्थितीत यवतमाळ जिल्हातील पुसद उपजिल्हा रुग्णालयातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

यवतमाळ जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचा दिसून येत आहे. अनेक कोरोना वायरस बांधीत रुग्णाला वाढला असताना रुग्णांचा रेमडेसीव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स मीळणे मुस्किल झाले आहे. तर दुसरीकडे पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे दहा व्हेंटिलेटर्स तब्बल सात महिन्यांपासून धूळखात पडुन आहेत अशी माहिती समोर आली आहे.

पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. व्हेंटिलेटरच्या वापरासाठी योग्य कारवाई करण्यात यावी व गंभीर रुग्णांचे प्राण व्हेंटिलेटरच्या सहायाने वाचविण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे.

2020 या वर्षी कोरोना वायरसच्या काळात पंतप्रधान योजनेतून पुसद उपजिल्हा रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते. मात्र, आवश्यक भूलतज्ज्ञ, डॉक्टजर्स व नियमित निरीक्षण ठेवणारी चमू उपलब्ध न झाल्याने व्हेंटीलेटर्स आजपर्यंत उपयोगात आलेले नाहीत. त्यापैकी पाच व्हेंटिलेटर्स यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठांच्या पत्रानुसार पाठविण्यात येणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here