हिंगणघाट येथे जम्बो कोविड सेंटर उभारा, वंचित बहूजन आघाडीची मागणी.

54

हिंगणघाट येथे जम्बो कोविड सेंटर उभारा, वंचित बहूजन आघाडीची मागणी.

हिंगणघाट येथे जम्बो कोविड सेंटर उभारा, वंचित बहूजन आघाडीची मागणी.
हिंगणघाट येथे जम्बो कोविड सेंटर उभारा, वंचित बहूजन आघाडीची मागणी.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.19 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रकोप वाढत आहे. त्या वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बाधीत रुग्ण मिळुन येत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

वर्धा जिल्हातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाट शहरात एक पण सर्व सुविधेने परीपुर्ण रुग्णालय नाही. हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण मिळुन येत आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडी डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांना मुख्यमंत्राना नावे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात हिंगणघाट व वर्धा येथे जम्बो कोविड सेंटर उभारनात यावे, दिवसेनदिवस कोरोना रुग्ण वाढीवर असून शासनाने आखुन दिलेली गाईड लाईनच्या नुसार नागरिक चालत आहे. पण हिंगणघाट तालूक्यात आणि आजुबाजुच्या गावात कोरोना वायरस बाधीत रुग्ण वाढीवर आहे. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेले असता रुग्णालयात डाॅक्टर व स्टापची कमतरता असल्यामुळे रुग्णांची तपासणी बरोबर होत नाही रुग्णाला डाॅक्टरान कडून सांगितला जाते. रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, व्हेंटीलेटर्स उपलब्ध नाही, ऑसीजनची कमतरता आहे. असे सांगून रुग्णाला सेवाग्राम किंवा सावंगी मेघे येथील रूग्णालयात पाठवले जाते पण तिथे भरती घेत नसल्यामुळे रुग्णांना आपला जिव गमवावे लागत आहे. या सर्व परिस्थिती वर मात करायची असेल तर हिंगणघाट व वर्धा येथे जम्बो अत्याअधुनिक कोविड सेंटर उभारन्यात यावे. व रुग्णालयात स्टॉप वाढविण्यात यावा सरकार फक्त लाॅकडाॅऊन कडे लक्ष देते, पण रुग्णाला ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहीजे त्याकळे मुळीच लक्ष देत नाही. त्या साठी आज आम्ही निवेदनातून मुख्यमंत्री यांना मागणी करतो, की लवकरात लवकर सोई उपलब्ध करून जन सामान्य नागरिकाच्या जिव वाचवा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदन देताना दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, चारू आटे, जिवन उरकुडे, प्रा.मनोहर भगत, देवेंद्र त्रिपल्लीवार, महेन्द्र हाडे, नितीन मैदलकर, विशाल थुल, प्रशांत शंभरकर, प्रदीप माणिकपुरे, किशोर लढे, प्रमोद कोसुरकर, संतोष सहारे, महेश लोहकरे, व्यंकटेश झाडे, मनिष कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.