भिम जयंती महोत्सव निमित्ताने भारतीय संविधानाचे वाटप कार्यक्रम संपन्न"

भिम जयंती महोत्सव निमित्ताने भारतीय संविधानाचे वाटप कार्यक्रम संपन्न”

भिम जयंती महोत्सव निमित्ताने भारतीय संविधानाचे वाटप कार्यक्रम संपन्न"

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.- ९८६९८६०५३०

मुंबई – सायन कोळीवाडा मधील प्रतिक्षा नगर व आणिक आगार बस डेपो जवळील पंचशील नगर क्र. ३ मध्ये दि. १६ एप्रिल २०२२ रोजी बौध्दजन पंचायत समिती,शाखा क्र. ६६१;आम्रपाली महिला मंडळ;
पंचशील गृहनिर्माण सोसायटी आणि अंभिरा स्पोर्टस् क्लब यांच्या
संयुक्त विद्यमानाने आयोजित
‘विश्वरत्न परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी
पाच दिवसीय भिम जयंती महोत्सव
‘ भारतीय संविधान मोफत वाटप’ करून साजरा करण्यात आला.

ह्या सोहळ्यासाठी माननीय बबन भाई राजापकर (माजी गटप्रतिनिधी बौ. पं. समिती), सन्माननीय विलास (डॉन) धोंडू कांबळे, प्रफुल्ल कांबळे (अध्यक्ष, अंभिरा स्पोटर्स क्लब) आणि आदरणीय बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी ह्यांच्या अथक प्रयत्नाने हा उत्स्फूर्त उपक्रम “भिम जयंती महोत्सव” दरम्यान उत्साहात राबविला आला. विशेष म्हणजे
महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्या महाराष्ट्र भर सुरु असलेल्या “घर घर संविधान” संकल्पनेतून युथ कॉंग्रेसचे मुंबई सचिव तुषार गायकवाड यांच्या विद्यमानाने महिला तालुकाध्यक्षा आणि समाज सेविका शबनम शेख यांनी शासकीय मुद्रीत “भारतीय संविधान” चे मोफत वाटप करत जनसामान्यांपर्यत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीचे कार्य केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व्दारे असा उपक्रम सर्वांसाठी आदर्श उदाहरण ठरेल.
मानवी अधिकार आणि कायद्यासंदर्भात आज जनजागृती होणे आवश्यक आहे, यासाठी असे उपक्रम अधिका-अधिक राबविण्यासाठी स्वस्फुर्तीने सामाजिक संघटनेने पुढे येऊन स्थानिक पातळीवर आयोजित करणे हि आजच्या काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here