शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा घात, विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
जीवती:- गुरू अथवा शिक्षक ह्यांना पुरातन काळापासुन ईश्वराच्या दर्जाचे स्थान देण्यात आले आहे तसेच गुरूंना आईची उपमा सुद्धा देण्यात येते. म्हणुनच पुर्वी शिक्षकांना मास्तर म्हंटल्या जायचे कारण शिक्षक हा मायच्या स्तराचा असल्याचे समजल्या जायचे मात्र आजकाल शिक्षकांच्या वागणुकीने हा स्तर कायमचा नाहीसा झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असुन अशाच एका घटनेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग करणाऱ्या शिक्षकास जिवती पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व दुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अच्युत खोवाजी राठोड वय 49 वर्ष हा शिक्षक मागील वर्षभरापासून शाळेतील विविध मुलींशी असभ्य वर्तन करत होता. प्राप्त माहितीनुसार शाळेच्या परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणी सुरू होती दरम्यान सदर शिक्षकाने एका मुलीला पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावले व त्या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
अच्युत खोवाजी राठोड ह्या शिक्षकाने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिच्या छातीला कुरावळणे व छातीला तोंड लावणे सुरू केले एव्हढेच नाही तर तिच्या गुप्तांगात बोट सुद्धा घातले. ह्या घटनेने भेदरलेल्या अल्पवयीन मुलीने तत्काळ घरी धाव घेऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला.
या ट्रेंडिंग बातम्या वाचल्यात का?
- राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करणारे “कबड्डीचे 100 महायोद्धे”
- नवा मोबाईल खरेदी करताय? तर १५ हजारांमध्ये ५० MP कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी देणारे हे सर्वोत्तम स्मार्टफोन नक्की पहा
- खोटा FIR दाखल झाला तर काय कराल?
घटनेची माहिती मिळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या नराधम शिक्षकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता शाळेतील एकुण सहा मुलींवर त्याने असाच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गडचांदुर येथील बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे ह्यांच्या नेतृत्वात अपराध क्रमांक 35/2022 नुसार भा दं वी च्या कलम 354(अ), 376(अ) 376(2)(एन) सह बाल लैंगिक अपरधापासून संरक्षण कायद्याच्या कलम 4, 6, 8,12 अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपी शिक्षकाला गजाआड केले आहे.