२८ एप्रिलपासून सुरु होणार टाका ग्राऊंडवर रोटरी क्लब उत्सव

करण विटाळे
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 880683907
हिगंणघाट:-स्थानिक रोटरी क्लब च्या वतीने हिंगणघाट येथील टाका ग्राउंडवर २८ एप्रील पासुन सुरु होणार्या रोटरी उत्सवाचे भुमिपुजन मा.आमदार समिर भाऊ कुणावार ,सुनिल भाऊ डोंगरे , रोटरी क्लब हिंगनघाट चे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार , सौ सोनाली केदार यांचे हस्ते करण्यात आले.
मागिल दोन वर्षापासुन कोरोनाच्या संसर्गामुळे हिंगणघाट शहरात होणारा रोटरी उत्सव होऊ शकला नाही,त्यामुळे लोकात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता होती .लोकांच्या आग्रहास्तव रोटरी उत्सव घेण्याचे ठरले.
या रोटरी उत्सवात क्लब दरवर्षी काही नाविन्यपुर्ण गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो.या वर्षीही महाराष्ट्र व राज्याबाहेरील आधुनिक वस्तुच्या स्टालधारकाला आमंत्रीत केले आहे.तसेन नवनवीन चविष्ट पदार्थाचे स्टाल धारक व सहकुटुबं येणार्या लहान मुलांसाठी आनंद देणारे ,भव्यदिव्य आकाश पाळणा,गाड्याची रेलचेल असेल असे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार,रो.उत्सवाचे चेअरमन पितांबर चंदानी व्हाईस चेअरमन ईंजि केदार जोगळेकर , उत्सव सचिव ड़ा सतीश डांगरे , शाकिर खान पठान , क्लब सचिव पुंडलिक बकाने , जितेंद्र वर्मा यांनी सांगितले.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घाेषित
- भारतामध्ये एक व्हायरस पसरत आहे…सोनिया गांधी यांचे देशाच्या नागरिकांना आवाहन
- अशोक परांजपे पुण्यतिथी विशेष: आतून कीर्तन वरून तमाशा’ नाट्यलेखक!
रोटरी उत्सव हिंगणघाट शहर वासीयानसाठी मनोरंजची मेजवानी असतेच पण यावर्षी त्यापेक्षाही अधीक मनोरंजन देणारा राहिल अशा शुभेच्या आमदार समिर भाऊ कुणावार यांनी दिल्या .
२८ तारखेपासुन सु्रु होणार्या रोटरी उत्सवाची तयारी करण्याकरीता संस्थापक अध्यक्ष ड़ा.अशोक मुखी प्रा.अशोक बोंगीरवार, सह प्रांतपाल मुरली लाहोटी, पूर्व अध्यक्ष मुकुंद मुँधड़ा ,सुरेश चौधरी , अतुल हुरकट ,प्रा माया मिहानी ,राजु गुळकरी , ड़ा रुपेश हिवरकर, पंकज देशपांडे ,क्रिश्ना जोशी , वैभव पटेलिया , नरेंद्र पोहनकर , हितेंद्र जोबनपुत्रा,ईंजि .राम देशपांडे , ईंजि रवि नल्लावार , मयुर चंदानी व सर्व रोटरी सदस्य सक्रियपने कार्य करीत आहे.या वेल्स इनर व्हील क्लब च्या पूर्व अध्यक्ष छाया लाहोटी , सुचिता मुँधड़ा , विद्या पेंडके , माधुरी शिवनकर , सरिता देशपांडे , वर्षा बोंगिरवार व सामाजिक कार्यकर्ता दिनेश वर्मा , कलोडे सर उपस्थित होते .