कौतुक करावे तेवढे कमी माविम ने केले सहकार्य, यशस्वी गटाची यशस्वीनी …ममता

राजेन्द्र मेश्राम  

गोंदिया शहर प्रतिनिधि 

मो:9420513193

माझा नाव ममता रामकिशोर ठाकरे आहे.मी धुनी भांडी करायला दोन चार घरी जाऊन आपला कसाबसा संसार करीत होते. मोडका कवेलू चा घर ज्याच्यात पावसाड्यात जागोजागी पानी टिपकत असायचा. खूपच हलाखीची परिस्थिती होती…दारुडा नवरा व माझा छोटासा 3 वर्साचा मुलगा.

       मला माझी परिस्थिती सुधारेल हे स्वप्नांत वाटले नाही.. कारण दारुडा नवरा दोन दिवस कामाला जायचा व बाकीचे दिवस दारू डोसून पडून राहायचा मी काही बोलले तर मला मारायचा. मी रडत रडत कामावर मुलाला सोबत घेऊन जात होते कारण घरी कोणीही नव्हते.

     एके दिवशी *महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उत्कर्ष लोक संचालित साधन केंद्र* सहयोगिनी ताई *दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान* अंतर्गत सर्वे करीत – करीत 

आमच्या घराकडे आले व गटाचे महत्व पटविले आणि 10 महिलांचा बचत गट बनविले. माझे गटाची स्थापना दिनांक 24/10/2017 ला करण्यात आली.मला यशस्वी महिला बचत गटाचे अध्यक्ष बनविले.गटाचे मासिक बचत 200 ठेवले. युनियन बँक मध्ये खाता उघडण्यात आले सुरुवातीलाआम्हाला गटाचे काहीही समझत नव्हते पण साहयोगिनी ताई च्या मार्गदर्शन मुळे आमचा गट चांगल्या प्रकारे चालू लागला.

मासिक बचत, अंतर्गत व्यवहार,10000 RF पण मिडाले. गटाला एक वर्ष झाल्यावर जास्त रुपये ची गरज असल्यामुळे ताई ने 200000 लाख icici बँक चे कर्ज मिळवून दिले. 7 महिलांना देण्यात आले मी 35000 घेतले.

     सहयोगिनी ताई ने मानवविकास अंतर्गत आमच्यागटाचे नावाने ई -रिक्षा फॉर्म भरले, सर्व सभासदांनी मला ई -रिक्षा देण्याचे ठराव सर्वानुमते मान्य केले.35000 ई – रिक्षा करीता दिले. मला माविम व उत्कर्ष लोक संचालित साधन केंद्र कडून ट्रेनींग मिडाली व रिक्षा चालवू लागली.मला दिवसा काठी 500-600 मिळू लागले. 

त्याचे मुळे माझी घरची परिस्थिती सुधारली. मी माझे icici बँक चे कर्ज पन परतफेड करू शकले.मला घरकुल योजने तुन घर मिडाले, माझे मुलाला इंग्लिश शाळेत ऍडमिशन केले. यशस्वी बचत गटात आल्या मुळे माझे संसार यशस्वी झाले. मी नेहमी माविम चे व आमच्या सहयोगिनी शालु मेश्राम ताई चे आभार मानते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here