महाराष्ट्राचे नवे राज्यपाल हि होणार कार्यमुक्त?
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
मो: 9284342632
मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातून उचलबांगडी झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र आता राज्यपाल रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तशा हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत.
तर दुसरीकडे राज्याला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, छत्तीसगड जिंकण्यासाठीच रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केले जाणार आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्यासारखा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यावर भाजपचा भर आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
त्याचबरोबर पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वमान्य चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून छत्तीसगडवर ताबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर रमेश बैस यांनी जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यापूर्वी जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. २०१९ मध्ये भाजप दुस-यांदा केंद्रात सत्तेत आली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.