माणगांव दिघी हायवेवर मौजे निलगून गावच्या हद्दीत ऍक्टिवा स्कुटी व एर्टिगा कार यांच्यात अपघात
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील माणगांव मोर्बा रोडवर आज सकाळी ८ च्या सुमारास ऍक्टिवा स्कुटी व एर्टिगा कार यांच्यात भिषण अपघात अपघातात राजेश लक्ष्मन गुगळे वय वर्ष २६ रा. निलगून ता. माणगांव हा जखमी झाला असून त्याला माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे हळविण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की राजेश गुगळे हा त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच ०६ बी एन ७७३६ ही माणगांव मोर्बा रोडने स्वतः चालवीत घेऊन जात असताना अपघात घटनास्थळी आल्या नंतर त्याच्या मागून माणगांव बाजूकडून मोर्बा बाजूकडे जाणारी राखाडी रंगाची एर्टिगा कार क्रमांक एम एच ४६ बी ऐ ४६०१ वरील आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल हमीद ताळसुलकर रा. दहिवली ता. माणगांव याने त्याच्या ताब्यातील एर्टिगा कार हायगयीने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधावं वेगात चालवून ऍक्टिवा स्कुटी ला ठोकर मारून अपघात केला व ऍक्टिवा स्कुटी वर असलेल्या राजेश लक्ष्मन गुगळे याला डोक्याला, हाता पायाला गंभीर स्वरूपात दुखापत झाली आहे.
या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजताज आरोपी यांच्यावर माणगांव पोलीस ठाण्यात कॉ गु रजि नं १२२/२०२३ नुसार भा द वि सं कलम २७९,३३७,३३८ मो. वा. कं. अधि.१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सह. पोलीस. निरीक्षक. आस्वर, पो. हवालदार कोळेकर, सह फौं. मगर हे अधिक तपास करीत आहेत.