डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे दुरुस्ती कार्य सुरू,52 लाखांचा निधी मंजूर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल

60

डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे दुरुस्ती कार्य सुरू,52 लाखांचा निधी मंजूर: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर : महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या दादमहल वॉर्डातील डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे दुरुस्ती कार्य सुरू झाले आहे. पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून शाळेच्या दुरुस्ती बांधकामाला सुरुवात झाली आहे..शाळेच्या दुरावस्थेची तक्रार पालकमंत्री मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने दादमहाल वार्डातील पालकांचा जीव सुखावल्याची चर्चा येथे आहे

भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व पठान माइनिंग अकॅडमीचे सचिव सोहेल शेख यांनी या शाळेची दुर्दशा पाहून मुलांवर संकट ओढवू नये म्हणून या संदर्भातील लेखी निवेदन शिक्षक आघाडीचे पालक व महानगर भाजपा महामंत्री इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांच्यामार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते.याची दखल घेत मुनगंटीवार यांनी तात्काळ 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला व दुरुस्ती कार्य सुरू झाले. मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी या कार्यात महत्वाची भूमिका बजावली.

भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जिलानी, सरचिटणीस सैफुल्ला पठाण, कृष्णकांत चौधरी, स्वागत सोनुले, हिमांशू बेरड, सैफ शेख, प्रज्वल हस्ते, औशेष वर्मा आदींनी सहकार्य केले. दादमहल वार्डातील बहुसंख्य मुस्लिम समाजाच्या वतीने सोहेल शेख यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.