म्हसळा शहरांतील श्री धाविर देव यात्रेच्या स्वागतासाठी भाविक सज्ज :
नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याची भक्ताना अपेक्षा
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा :- म्हसळा शहरातील श्री धाविर देव यात्रा तिथी प्रमाणे चैत्र शुद्ध चतुर्दशीला होत असते ती या वर्षी सोमवार दि २२ एप्रिल रोजी येत आहे .यात्रेला गावाकडे येण्यासाठी नोकरदार मंडळींची तयारी झाली आहे. स्थानिक यात्रेचे आयोजक आणि हिंदू ग्रामस्थ यांनी भक्तांच्या स्वागताची तयारी केली आहे .म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून भक्ताना विविध ठीकाणी विद्युत दिव्यांची सोय, चौका चौकांत हॅलोजन दिव्यांची सोय होत असते.नगर पंचायतीचे माध्यमातून शहरांत यावर्षी बंद गटारांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे गल्ली-बोळांतून असणारा रस्ता फारच अरुंद झाला आहे .
श्री धाविर देव आणि अन्य मंदीरांचे परिसरांतील साफसफाई, पालखी परीसरांतील नगरपंचायत हद्दींतील आणि पालखी मार्गावरील रस्त्यांची साफसफाई व्हावी अशी रास्त मागणी नागरिकांकडून होत आहे तसे निवेदन यात्राप्रेमी आणि श्री धाविरदेव भक्त विशाल सायकर यानी दिल्याचे समजते. शंकर मंदीर परिसरांतील बापूजी देवस्थान मार्गावरील वादळांत पडलेले झाड आणि मार्ग पावसाळ्यात खराब झाला आहे. त्याची डागडुजी होणे भक्ताना अपेक्षीत आहे. म्हसळयाचे श्री धाविर देव मंदिर हे प्राचीन असून मुख्यदेव श्री धाविर देव, यांचे समवेत रवळनाथ,अवळनाथ, बापूजी, जोगेश्वरी,भैरी आणि काळेश्री आशा देव- देवतेच्या अन्य देवांची पालखी नगरपंचायत हद्दीतील ब्राह्मण आळी, मामासावंत घरा पासून साईनाथ आळी,गौवळवाडी, कुंभार आळी, कुडेकर बिल्डिंग, बस स्थानक पासून कुडतुडकर घर, तसेच बाजार पेठ, सोनार आळी, तांबट आळी, एकता नगर, रोहिदास नगर, कन्याशाळा, उमरोटकर- बोरकर परिसर, मातोश्री पार्क बिल्डिंग या मार्गावरून जात असते.
—————————————
नगरपंचायतीच्या माध्यमांतून वरील मार्गावर साफसफाई आणि पोलीसांमार्फत वाहतुकीची व्यवस्था चोख असावी अशी भाविकांची रास्त मागणी आहे .