संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अंकिता जळीतकांडाची उलट तपासणीचे कार्य पुर्ण.

58

हिंगणघाट,दि.19 मे:- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या प्राध्यापक अंकिता पिसुड्डे जळीतकांडाची सुनवाही माघील अनेक दिवसापासून सुरु आहे. आज अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तृप्ति जाधव यांच्या उलट तपासणीचे काम आज बचाव पक्षा कडून पूर्ण करण्यात आले. उलट तपासणी अँड भुपेन्द्र सोने यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या खंडपीठासमक्ष केली. दुपारी 1 पर्यंत असलेली न्यायालयीन वेळ प्रकरणाचे गाभिर्य लक्षात घेता, न्यायाधीशांच्या वतीने अर्धा तास वाढविण्यात आली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी आभासी माध्यमाद्वारे न्यायालयीन कामकाजात आपला सहभाग नोंदविला.

उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या उलट तपासणीचे काम पूर्ण झाल्यामुळे सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासणीचे कामकाज संपविण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीच्या बयानाकरीता उद्या 20 मे रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या उलट तपासणीत अस्पष्टता असल्यामुळे त्याचा खुलासा करण्याकरीता व काही बाबी न्यायालयासमोर याव्यात यासाठी अँड. उज्वल निकम यांनी फेरतपासणी अर्ज केल्यामुळे त्या अर्जावर बचाव पक्षाचे वकील व सरकारी वकिलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून तो अर्ज नामंजूर केला आहे. यावेळी स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील दिपक वैद्य सहभागी होते.