अवैध दारु तस्करांच्या रडारवर आता पोलीस कर्मचारी; कोणतीही चौकशी न करता डी.बी पथक बरखास्त.

51

अवैध दारु तस्करांच्या रडारवर आता पोलीस कर्मचारी; कोणतीही चौकशी न करता डी.बी पथक बरखास्त.

अवैध दारु तस्करांच्या रडारवर आता पोलीस कर्मचारी; कोणतीही चौकशी न करता डी.बी पथक बरखास्त.
अवैध दारु तस्करांच्या रडारवर आता पोलीस कर्मचारी; कोणतीही चौकशी न करता डी.बी पथक बरखास्त.

अमोल माकोडे, ब्रह्मपुरी तालुका प्रतीनिधी ✒
ब्रह्मपुरी :- चंद्रपूर जिल्हात 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी घोषित करण्यात आली. दारुबंदीनंतर अवैध दारू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. जिल्ह्यात अवैध दारू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, कोट्यवधी रुपयांची दारू, हजारोंच्या संख्येत आरोपी पोलिसांनी पकडले. काही प्रकरणी पोलिसही अवैध दारू माफियांच्या गोत्यात सापडले मात्र आजही अनेक पोलीस प्रामाणिकपणे कार्य करीत अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळत आहे.

आता चित्र बदलले असून खुद्द दारू तस्कर पोलिसांना टार्गेट करायला लागले आहे. जिल्ह्यातील टोकावर असलेला तालुका म्हणजेच ब्रह्मपुरी 11 मे ला बेटाळा फाटा येथे नाकेबंदी करून डीबी पथकाने 20 पेटी अवैध दारू पकडली, या प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यात आली होती, मात्र ब्रह्मपुरी येथील नावाजलेल्या दारू तस्कराने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
सदरच्या कारवाईत 20 पेट्या नसून 50 पेट्या पकडल्या अशी बोंब खुद्द दारू तस्कराने उडवली.
शहरात वेगात पसरलेली ही अफवा ब्रह्मपुरी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कानावर पोहचली त्यांनी या कारवाईची सखोल चौकशी न करता तात्काळ ब्रह्मपुरी स्थानिक गुन्हे शोध पथक बरखास्त केले.

11 मे ला गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली होती मात्र दारू तस्करांना ही कारवाई पचनी पडली नाही, ब्रह्मपुरी तालुक्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतभेदात लहान कर्मचारी बळी ठरतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे शोथ पथक बरखास्त करणे होय.

चंद्रपूर जिल्ह्यात आज अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा असो की स्थानिक पोलीस हे करीत आहे. पोलीस विभागाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या निष्पाप बळी या दारू तस्करांनी घेतला होता ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातीलचं होती. कोरोनाच्या महामारीत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावीत आहे. बेटाळा येथे 11 मे ला झालेली कारवाई स्थानिक नागरिकांनी सुद्धा बघितली होती, त्यानंतर ही पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी चौकशी न करता पोलीस कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढणे हे संशयास्पद आहे.