जिवती नगरपंचायतने नाल्यात घर बांधण्याची परवानगी दिली कशी? नागरिकांचा सवाल.

50

जिवती नगरपंचायतने नाल्यात घर बांधण्याची परवानगी दिली कशी? नागरिकांचा सवाल.

अवैध्य बांधकाम तत्काळ थांबवा जिवती येथील नागरिकांची मागणी.

जिवती नगरपंचायतने नाल्यात घर बांधण्याची परवानगी दिली कशी? नागरिकांचा सवाल.
जिवती नगरपंचायतने नाल्यात घर बांधण्याची परवानगी दिली कशी? नागरिकांचा सवाल.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

जिवती:- येथे नाला असलेल्या जागेवर चक्क घराचे बांधकाम सुरू असून घर बांधकाम करणारे आंबटवार आडनावाचे व्यक्ती असल्याची माहिती आहे.

आंबटवार यांना जिवती नगरपंचायत ने नाल्यात घरबंधकामाची परवानगी दिली असून नगरपंचायत च्या परवानगीनेच बांधकाम सुरू असून मी घराचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे घर बांधकाम करणारे व्यक्ती बोलून दाखवीत आहे. यामुळे नगरपांचतीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

ज्या जागेवर घर बांधकाम सुरू आहे तिथे नाला असून पावसाळ्यात त्याच जागेतून पाणी वाहत राहते. जिवंत नाला असल्याने घरामध्ये पाणी अडवल्या जाईल व मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असताना नगरपंचायती ने नाला असलेल्या जागेवर घर बांधकामाची परवानगी दिली कशी? असा प्रश्न जिवती येथील सजग नागरिकांना पडलेला आहे.

परवानगी देताना कोणत्या वाटाघाटी झाल्या असाव्या असेही नागरिक बोलत आहेत. जिवती शहराचा टाऊन प्लॅन आहे की नाही यावरच आता नागरिकांना शंका येत आहे. नाल्यात बेकादेशीर घराचे बांधकाम सुरू असून तत्काळ बांधकाम थांबवावा व दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.