खरीप हंगामापूर्वी शेती कामे खोळंबली अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहार फुटीवर परिणाम.

54

खरीप हंगामापूर्वी शेती कामे खोळंबली, अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहार फुटीवर परिणाम.

खरीप हंगामापूर्वी शेती कामे खोळंबली, अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहार फुटीवर परिणाम.
खरीप हंगामापूर्वी शेती कामे खोळंबली, अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहार फुटीवर परिणाम.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी

कळमेश्वर:- संत्रा उत्पादक शेतकरी चिंतित उत्पादनात घट होण्याची शक्यता कळमेश्वर तालुक्यातील अचानक वातावरण झालेला बदल यासोबतच उन्हाळ्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादकांना व संत्र्याच्या मृग मृग बाराला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे यंदा कळमेश्वर तालुक्यातील संत्र्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका तीन वर्षापासून बसतो आहे. खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला या प्रसंगी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रब्बीच्या गहू, चना या पिकाचे उत्पादन कमी असूनही भाव मिळाला नाही. उन्हाळ्यात तापमानात योग्य वाढ झालेली नाही. सतत ढगाळ वातावरण व वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या संत्रा बागा उत्पादनाच्या बागांमध्ये ग्रुप बाराची फूट होण्याची शक्यता कमीच आली आहे.

अक्षय तृतीया पासून शेतकरी संत्रा झाडांना पाणी देणे बंद करतात त्यामुळे उन्हाळ्यात संत्रा झाडे वाढू लागतात ग्रामीण भाषेत याला झाडाला ताण देणे असे म्हणतात नंतर जूनमध्ये जोरदार पाऊस येतो तेव्हा ही संत्रा झाडे पांढऱ्या फुलांनी भरून जातात नंतर याच फुलांचे रूपांतर फळात होतो पण वातावरण झालेल्या बदलामुळे यांना या प्रक्रियेत खंड पडला यामुळे बार फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.