विविध संघटनांच्या वतीने पदोन्नति आरक्षणासाठी आंदोलन.

✒ ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी ✒
पाचोरा:- महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 शासन आदेश रद्द करुन पदोन्नती कोट्यातील 33% टक्के आरक्षित पदे 25 मे 2004 च्या शासन आदेशानुसार एस.सी / एस.टी / व्हि.जे.एन.टी / एस.बी.सी व ओबिसी या मागास प्रवर्गतील अधिकारी व कर्मचारी यांनाच पदोन्नती कोट्यातील आरक्षित पदे भरण्यासाठी शासन आदेश निर्गमित करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, महाराष्ट्र (RMBKS) अंतर्गत सर्व सहयोगी प्रोटाॅन राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ, राष्ट्रीय घुमतु जनजाती मोर्चा, राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा, बुद्धीष्ट इंटरनेशनल नेटवर्क या संघटनेच्या इतर शाखा तर्फे आंदोलन आज 19 मे रोजी संपन्न झाले या आंदोलनाला पाचोरा तालुक्यातून ही निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आला पाठिंबा देणारे संघटन राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद, प्रोटाॅन बहुजन कांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार साहेब पाचोरा यांना जाकीर तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद उपाध्यक्ष) यांनी निवेदन देण्यात आले तसेच आदिवासी एकता परीषदेचे कार्यकर्ते जलाल तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तालुका अध्यक्ष) जिल्हा अध्यक्ष रणजित तडवी, गफुर तडवी, आलेरखा तडवी, सरवर तडवी, अफजल तडवी, मुस्तफा तडवी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.