वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वर्धा जिल्ह्याच्या वतीने कोरोना काळात रक्तदान उपक्रम.

53

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघात:- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद सातत्याने जिल्ह्यात सामाजिक उपक्रम राबवित असते. कोरोणाच्या काळात वर्धा जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सातत्याने निस्वार्थपणे रक्तदान करून कित्येक नागरिकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोरोनाच्या मागील एका वर्षाच्या काळात शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप तर्फे आज पर्यंत 183 गरजू रुग्णांना रक्तदान करून रुग्णाचे जीव वाचविण्यास मदत केली आहे व हे कार्य सतत्याने सुरु आहे. शासन- प्रशासन व ब्लड बँक तर्फे या उपक्रमाकरिता संघटनेला सन्मानित देखील करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष नीरज रा. बुटे यांच्या मार्गदर्शनात अमर बेलगे, धीरज चव्हाण, शांतनु भोयर, अक्षय इंगोले, धनंजय जाधव, दिनेश काटकर, अक्षय थुटे, दीपक नवघरे, पीयूष ठाकरे, सुरजीतसिंग अकाली, अमरभाऊ देशमुख आदी जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहे.