तलाव खोदकामात आढळले प्राचीन यादवकालीन शिल्प भेजगाव येथील तलावाच्या पाळीवर हेमाडपंथीय मंदिर

तलाव खोदकामात आढळले प्राचीन यादवकालीन शिल्प

भेजगाव येथील तलावाच्या पाळीवर हेमाडपंथीय मंदिर

तलाव खोदकामात आढळले प्राचीन यादवकालीन शिल्प भेजगाव येथील तलावाच्या पाळीवर हेमाडपंथीय मंदिर

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 ८८३०८५७३५१

मूल, ता. १८ : चंद्रपूर जिल्ह्यातील भेजगाव येथील मामा तलावाच्या अकराव्या शतकातील यादवकालीन शिल्प आढळले आहे. या तलावामध्ये खोदकाम सुरू असताना सदर शिल्प येथील मजुरांना सापडले. सापडलेले शिल्प बघून मजुरांनी एकच गर्दी केली. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या ठाकलेल्या आहेत. मंगळवारी जिल्हयाच्या इतिहासात अधिक भर पडली. भेजगाव येथील मामा तलावामध्ये तलाव खोलीकरणाचे काम सुरू आहे. हे काम रोजगार हमीच्या माध्यमातून सुरू आहे. तलावाचे खोदकाम करतानाच मजुरांना शिल्प आढळून आले. ते यादवकालीन आहे. या तलावाच्या पाळीवर खोदकामादरम्यान देखणे हेमाडपंथीय मंदिर आहे. या शिल्पात एका रेड्यावर अथवा मेंढ्यावर गदाधारी पुरूष मांडी घालून बसलेला दिसतो. त्याच्या डाव्या हातात गदा आहे. शिल्प जीर्ण झाले आहे. अकराव्या, बाराव्या शतकात चंद्रपूरचा काही भाग यादवांच्या सत्तेखाली होता. सत्ताकाळात यादवांनी अनेक हेमाडपंथीय मंदिरांची निर्मिती या भागात केली होती.

इतिहास अभ्यासक अरुण झडकर यांच्या मते राजपुतांच्या अग्निकुलापैकी परमार हे एक राजवंश होय.परमार राजवंशात अग्नीदेवतेला कुलदैवत मानत.अग्नी ही हिंदू धर्मातील अग्नीची देवता आहे .वैदिक काळापासून सर्वोच्च देवतांपैकी एक आहे. सुप्रसिद्ध धारानृपती भोज यांचा पुतण्या उदयादित्य यांचा मुलगा जगद्देव यांनी या भागाचे राज्य केले. जगद्देव हा या प्रदेशाचा स्वतंत्र शासक होता. या प्रदेशातील परमारांच्या संपर्कामुळेच मध्यप्रदेशातील स्थापत्य शिल्पकलेचा प्रवेश येथे झाला.