पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार २१ ग्रामसेवकांच्या हाती; ८ ग्रामसेवकांची पदे रिक्त

पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार २१ ग्रामसेवकांच्या हाती; ८ ग्रामसेवकांची पदे रिक्त

पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार २१ ग्रामसेवकांच्या हाती; ८ ग्रामसेवकांची पदे रिक्त

📰मीडिया वार्ता न्यूज📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संदिप जाबडे – ८१४९०४२२६७

पोलादपूर(रायगड)- तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीचा कारभार 21 ग्रामसेवक आपल्या खांद्यावर घेऊन हाकत आहेत त्यातच सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कापडे ग्रामपंचायत ला 2020 पासून ग्रामसेवक नाही तर 2004 पासून बोरावळे चा कारभार इतर ग्रामसेवक याच्या कडे अतिरिक्त दिला आहे
ग्रामसेवक हा महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो. ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. असे असले तरी जिल्हा निवड मंडळ कडून पोलादपूर तालुक्यातील ग्राम सेवकाच्या विविध प्रश्नावर लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे
पोलादपूर ग्रामपंचायत चे रुपांतर नगरपंचायत मध्ये झाले इतर तालुक्यात सकारात्मक बदल घडतील तसेच शहरात हि बदल घडेल अशी आशा येथील ग्रामस्थ नागरिकांना वाटत होती मात्र ती काही प्रमाणात फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे सर्वच आघाडीवर तालुका मागे पडत चालल्याने अनेक तरुणांनी विकसित शहराकडे कूच केली आहे
गटविकास अधिकारी धनंजय जगताप याच्याशी विचारणा केली असता तालुकात 29 पदे मंजूर असताना 21 पदे भरली गेली आहेत 8 ग्रामसेवक पदे रिक्त आहेत.

तालुक्यात 42 ग्राम पंचायत असून सद्य स्थिती 21 ग्राम सेवक कार्यरत आहे 29 पदे मंजूर असताना जिल्हा निवड मंडळातर्फे नव्याने पदे भरली जात नसल्याने अनेक ग्राम सेवक यांना दोन तीन ग्रामपंचायतीचा कारभार बघावालागत आहे.

रिक्त पदांमुळे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

रिक्त पदामुळे ग्रामपंचायत मधील अनेक कामे संथगतीने होत आहेत यामध्ये कर वसुली करणे. वसुलीतून गावविकासाची कामे करणे, पाणीपुरवठा, साफसफाई,दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे आदीचा समावेश आहे तर शासनाच्या विविध योजना राबविताना ग्रामसेवकाचे कसब पणाला लावावे लागत असून शासनाने ग्रामस्थाचे कामकाज तसेच ग्राम सेवकाच्या दिवस रात्र होणारी कसरत पाहून रिक्त पदे तातडीने भरावी व कामचुकार पणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.