निसर्गातील आश्चर्ये: चीनमधील हे स्वर्गाचे प्रवेशद्वार आपण पाहिलेत का?

मनोज कांबळे: चीनमधील चित्तथरारक टियानमेन पर्वतामध्ये स्थित ‘स्वर्गाचे द्वार’ म्हणून ओळखले जाणारे आकाशीय प्रवेशद्वार आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे 5,000 फूट उंचीवर, चीनमधील तिआनमेन गुहेमध्ये ही जगातील सर्वात उंच नैसर्गिकरित्या तयार केलेली कमान आहे.

या कमानींमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना 999 पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्यांना “स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या” म्हणून संबोधले जाते. नऊ क्रमांकाला चीनी अंकशास्त्रात महत्त्वपूर्ण अर्थ आहे, नऊ अंक शुभ आणि अनंतकाळचे प्रतीक मानले जाते.

 

कमानीपर्यंत पोहचण्यासाठी पर्यटक अरुंद रस्त्याने जाणाऱ्या बस प्रवासाची निवड करू शकतात. टियानमेन पर्वतामढील ही गुहा पूर्वी एक सामान्य गुहा होती. परंतु इ.स. 263 मध्ये, पर्वताच्या कठड्याचा एक भाग कोसळला, ज्यामुळे “स्वर्गाचे द्वार” मानल्या जाणाऱ्या मनमोहक कमानीचे रूप समोर आले जे आजपर्यंत जगभरातील पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

हे आपण वाचलंत का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here