महाआरोग्य शिबीरनिमित्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनात्मक बैठक पुर्वनियोजन बैठक संपन्न

69

महाआरोग्य शिबीरनिमित्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनात्मक बैठक पुर्वनियोजन बैठक संपन्न

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मनोज गोरे

मो.9923358970

चंद्रपूर: येत्या २६ मे २०२४ रोजी कोरपना येथे देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे; या पार्श्‍वभूमीवर आज स्थानिक राज कान्वेंट येथे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनात्मक बैठक घेतली.

शिबीरिच्या उत्तम आयोजनासाठी करावयाची पुर्वतयारी आणि जवळपास सर्वच आजारांवर निदान, शस्त्रक्रिया व उपचार होत असलेल्या या भव्य महाआरोग्य शिबीराचा परीसरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, अशा पद्धतीने करावयाच्या नियोजनासंदर्भात याठिकाणी चर्चा पार पडली.

यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, गडचांदूरचे शहराध्यक्ष सतिश उपलेंचवार, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, निलेश ताजणे, माजी पं. स. सभापती संजय मुसळे, माजी पं. स. सदस्य नुतनकुमार जिवणे, किशोर बावणे, अमोल आसेकर,नगरसेवक अरूण डोहे, रामसेवक मोरे, संजय उपग्नालावार, विनोद नरेन्दुलवार आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.