विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव च्या चेअरमन पदी तुकाराम सुतार तर व्हाईस चेअरमन पदी रामचंद्र मेस्त्री यांची निवड
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव जि. रायगड, या संस्थेची सर्वसाधारण सभा माणगाव येथे दि 15 मे रोजी पार पडली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या सभेत पंचवार्षिक संचालक मंडळाची निवड करण्यात आली यावेळी चेअरमन पदी, संजय गांधी निराधार योजनेचे माणगाव तालुका अध्यक्ष, मा.श्री. तुकाराम सुतार साहेब, यांची निवड करण्यात आली, तर व्हा.चेअरमन पदी चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवसेना उप विभाग प्रमुख मा.श्री. रामचंद्र मेस्त्री साहेब, यांची निवड करण्यात आली, तसेच आदि समाज कार्यकर्त्यांची संचालक पदि निवड करण्यात आली चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यावर सर्व सुतार समाज,व इतर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला काहींनी प्रत्येक्ष भेटून व सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले