नरेश विचारे यांना ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्कार प्रदान

 

संतोष उद्धरकर

म्हसळा तालुका प्रतिनिधी

मो: ७८७५८७१७७१

अविष्कार फाउंडेशनतर्फे क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न’ गौरव पुरस्कार म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या नरेश विचारे यांना मिळाला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , पन्हाळगड येथे जागतिक न्यूरो सर्जन डॉ संतोष प्रभू, संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते विचारे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी तंत्र शिक्षक संतोष चव्हाण, पदवीधर विभाग शिक्षक किशोर मोहिते उपस्थीत होते.नरेश विचारे हे म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागासारख्या मोठ्या विभागाची धुरा गेली अनेक वर्षे एकटेच संभाळत आहेत.शिक्षण विभागामध्ये एकूण २३५ शिक्षक कार्यरत असून त्यांची आस्थापना तनमनधन लावून सांभाळत आहेत.शिक्षण विभागामध्ये तीन लिपिक वर्ग मंजूर असून त्यापैकी केवळ एकच पद सध्या कार्यरत आहेत त्या पदावर नरेश विचारे हे काम करीत आहेत.संपूर्ण शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने सुट्टीच्या दिवशी सुद्धा ते आपल्या कार्यालयात हजर राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अविष्कार फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here