म्हसळ्यांत पाऊस आला अवकाळी, कुंभार व्यवसायीकांवर संकट आले भारी
संतोष उद्धरकर
म्हसळा तालुका प्रतिनिधी
मो: ७८७५८७१७७१
म्हसळा:बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा सौ.वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर यानी सांगितले . मातीच्या वस्तुंमध्ये माठ, रांजण, कुंड्या, मडकी, धार्मिक कार्यक्रमांत लागणारी सुगडी, झाकण्या,एकेरी आणि दुहेरी चुली ह्यावस्तू मोठ्या प्रमाणांत होत्या यामध्ये सौ.वासंती आणि लता व्यतीरीक्त मनाली निलेश परबलकर, विद्या गणेश बिरवाडकर,मानसी महेश म्हशीलकर, वंदना वसंत बिरवाडकर, सुजिता जितेंद्र म्हशीलकर, लिलाबाई गजानन म्हशीलकर, भिकी कलमकर या महिला व्यवसायीकांचे नुकसान झाले . त्यांचे प्रत्येकी किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आंदाज संबंधीतानी वर्तविला .
या वस्तू कच्च्या मालापासून बनविणे आणि विक्री हे सर्व महिला वर्गच पहात आसतात , आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना सौ.वासंती आणि लता रडवेल्या झाल्या होत्या त्यांनी कुंभार कामासाठी विशिष्ट प्रकारची माती लागते,माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कु्टून बारीक करतात. त्यानंतर त्यामध्ये गाईचे शेण – गोमूत्र ,राख, भाताचे तूस , कोळसा पावडर वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे छोटे – मोठे गोळे बनवून त्या पासून आवश्यकती कलाकृती बनविली जाते असे लता मावशीनी सांगितले .
म्हसळा शहरात स्वतंत्र कुंभार आळी असून समाजाची सुमारे ४० घरे आहेत , महाराष्ट्रातील कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद काळापासून कुंभार समाजआहे शासनाने आम्हाला मालाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात नैसर्गिक अपत्तीमध्ये शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे .आम्ही ही मागणी श्रीवर्धनच्या आमदार आणि मंत्री अदीतीताईं तटकरेंकडे लावून धरणार आसल्याचे सौ.वासंती आणि लता यानी सांगितले .