स्वदेस फाउंडेशन चे (CEO) मंगेश वांगे सर तसेच( डायरेक्टर) प्रसाद पाटील सर यांच्या हस्ते रायगड मधील सात तालुक्यातील ज्ञान मित्रांना (प्रशिक्षण /मार्गदर्शक )म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

नितेश पुरारकर

गोरेगाव विभाग प्रतिनिधी 

मो: ७०२११५८४६०

गोरेगाव -स्वदेस फाऊंडेशन मोठ्या प्रमाणात पसरलेला वटवृक्ष असून, हजारो नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धीची शाश्वत सावली देण्याचे काम करत आहे.आशाताच रायगड जिल्ह्यात जवळपास सात तालुक्यातील असंख्ये गावे स्वदेसने आदर्श गावे घोषित केली आहेत.आणि हेच कार्य अविरतपणे संपूर्ण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात चालू ठेवण्याच्या हेतूने पुढे सरसावात असताना ज्ञानमित्र ही संकल्पना अमलात आणली. मूळ उदिष्ट ज्ञान मित्राद्वारे सामाजात व्यावसायिक व सामाजिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी व अमूलाग्रह बदल घडवण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्हातील सात तालुक्यामध्ये ज्ञानमित्र संकल्पना निर्माण केली गेली.

याद्वारे विविध उपक्रम जसे की शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, आर्थिक साक्षरता, महिला बचत गट,. निगराणी समिती, कृषी, इत्यादी विषयांची माहिती तसेच प्रशिक्षण देण्यास स्वदेस फाउंडेशनच्या मदतीस रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील एकूण ३८ ज्ञान मित्रांची निवड केली गेली. माणगांव-मधून ११.तळा-२ श्रीवर्धन-३ पोलादपूर-२ म्हसळा- ९ सुधागड-४ महाड-७ असे ज्ञान मित्राच्या समावेश केला गेला.

 ७ तालुक्यातील ज्ञान मित्र तसेच स्वदेस प्रतिनिधी व रोहिणी जोशी साने गुरुजी स्मारक वडघर माणगांव येथे उपस्थित होते. या सर्व ज्ञान मित्रांनी समाजसेवा भावनेतून समाजासाठी गावासाठी आपल्या भागातील विविध प्रकल्पांची माहिती आणि प्रशिक्षण देण्याचे बहुमूल्य काम हाती घेतले आहे.तसेच स्वदेस फाउंडेशन मार्फत घेतलेल्या गुणवत्ता चाचणी मध्ये उत्तीर्ण झाल्याने स्वदेस फाउंडेशनने त्यांना ज्ञान मित्र (प्रशिक्षक-मार्गदर्शक)म्हणून घोषित केले.स्वदेस फाउंडेशन चे (CEO) मंगेश वांगे सर तसेच ( डायरेक्टर) प्रसाद पाटील सर. प्रशांती मॅडम यांच्या हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले. (CEO)मंगेश वांगे सर तसेच( डायरेक्टर)प्रसाद पाटील सर यांनी सर्व ज्ञान मित्र यांना मोलाचे मार्गदर्शन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रवीण संते व अन्नू झा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.सुधीर वाणी यांनी ऍक्टिवीटी प्रोग्रॅम हाताळले. तसेच अमृता बदडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे शेवट पर्यंत सूत्र संचालनाची कार्य पाहिले व अखेर सर्वांचे आभार मानून कार्यक्रम समाप्ती ची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here