28 जूनपासून शिक्षक ऑफलाईन तर विद्यार्थी असणार ऑनलाईन
मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्

मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
19/06/2021आर्वी : 28 जूनपासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांविना यंदाही शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व इतर माध्यमांत शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षणविभागाने दिले आहे. शिक्षक संचालकांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना शाळा सुरू करण्याचे आदेश 16 जून रोजी निर्गमित केले आहे.त्यानुसार, इयत्ता पहिली ते आठवीकरिता 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खाजगी शाळेतील व्यवस्थापनाने शाळा शुल्काच्या बाबतीत शिक्षक-पालक संघात निश्चित झालेल्या फीचा तक्ता शाळेतील दर्शनी भागात लावावा. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ व स्थानिक प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून शालेय कामकाज सुरू करावे. 27 जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा ऑनलाइन,
कायकोविड-19 सर्व नियमांचे पालन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय कामी उपस्थित राहून कामकाज सुरू करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने वेबिनार आयोजित करावीत. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना शंभर टक्के शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र, कोरोना संपलेला नाही. कोरोना नियमांचे पालन करून, त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्वांनी शाळेत काळजी घेणेही आवश्यक आहे. डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी