*जागतिक योगदिनाचे 21 जूनला आयोजन*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
नागपूर दि. 18 : जागतिक योगदिनानिमीत्त 21 जूनला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे झूम मिटींगव्दारे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योग संघटनांच्या सहकार्याने 21 जून हा जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतात. 21 जूनला सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यावेळेसही झुम मिटींगव्दारे ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे.
तरी जिल्ह्यातील शैक्षणीक संस्था, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, नागरिक व विद्यार्थ्यांनी पुढील झुम मिटींग लिंकवर योगदिनी सकाळी 6.30 वाजता सहभागी व्हावे असे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
एचटीटीपीएस://युएस04डब्ल्युइबीडॉटझुमडॉटयुएस/जे/7628242017?पीडल्युडी=व्हीवायएस3युसी9झेडडीयुएनबीआर1डीएझेडएमपीबीईएफएफ2ईझेडझेड09 या लिंकवर क्लीक करावे.
यासाठी पासकोड : योगा2021