*रविवारी मार्मिक कविसंमेलन*

53

*रविवारी मार्मिक कविसंमेलन*

*रविवारी मार्मिक कविसंमेलन*
*रविवारी मार्मिक कविसंमेलन*

मिडीया वार्ता न्यूज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे

नवसर्जनशील साहित्य परिवाराच्या वतीने रविवार दिनांक 20 जून रोजी राज्यस्तरीय मार्मिक कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.
या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून खान्देशातील सुप्रसिद्ध कवी व कथाकार मा. सुनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वास्तववादाचा विजय व्हावा व चुकीच्या प्रवृत्तींना चपखलपणे फटकारे हे मार्मिक साहित्याचे वैशिष्ट्य आहे.
यातून समाजप्रबोधनाचे खूप मोठे कार्य होत असते. अवास्तव कल्पनासृष्टीपेक्षा मार्मिक साहित्य हे केव्हाही समाजहिताचे असते. याच उद्देशाने या संमेलनाचे संयोजन केले आहे अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक कवी समाधान गायकवाड यांनी दिली. या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी तथा निवेदक बबनदादा चखाले, ‘बिगारी’कार कवी डॉ. मदन देगावकर, मानवाधिकारासाठी लढणारे सुप्रसिद्ध कार्यकर्ते मा. संजय साळुंखे, सुप्रसिद्ध पत्रकार मा. लक्ष्मण सांगवे, पत्रकार मा. बाबा तारे, युवासंवादचे संपादक मा. धनराज गरड, कवी- समीक्षक मा. विजय लोंढे, कवी, प्रकाशक बापूसाहेब भोंग, कवी मा. प्रतिक कांबळे, सामजिक कार्यकर्ते मा. दिलीप मोरे हे उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनासाठी निमंत्रित म्हणून संतोष पावरा ( नंदूरबार ), अकबर शेख, राहुल निकम ( सोलापूर ), राणी श्रृंगारे ( लातूर ), प्रज्ञा आपेगावकर ( अंबाजोगाई ) औदुंबर भोसले ( इंदापूर ), वर्षा शिदोरे ( नाशिक ), स्नेहल सोनटक्के, शितल ढगे ( यवतमाळ ), संजय दोबाडे( त्र्यंबकेश्वर ) , करणसिंग तडवी ( शहादा ), आशाताई शिंदे, उमा लुकडे, डॉ. शुभा लोंढे, कविता काळे, योगिता कोठेकर ( पुणे ), ज्योती लाड ( बीड ), बापूसाहेब सोनवणे, दिलीपकुमार चव्हाण, प्रशांत गायकवाड ( मुंबई ), तुषार पाटील ( जळगाव ), सुरज अंगुले ( उस्मानाबाद ), आत्माराम हारे, आनंद गायकवाड , चंद्रकांत जोगदंड, सुभाष महाराज बडदे, कवी गौरव नेवसे ( पुणे ) नवनाथ खरात ( करमाळा ) प्रकाश तोटेवाड ( पंढरपूर ) इत्यादी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. हे संमेलन कोरोनामुळे गुगल मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 20 जूनला सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे अशी माहिती संयोजक समाधान गायकवाड यांनी दिली.