उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील* *३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित*

55

*उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील*
*३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित*

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील* *३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित*
उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील*
*३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

अकोला,दि. १८ (जिमाका)- उमा बॅरेज प्रकल्पांतर्गत मौजे लंघापूर येथील पूर्णत: बाधित ३०५ प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाण मौजे सिरसो ता.मूर्तिजापुर येथे ईश्वरचिठ्ठी पद्धतीने भूखंड निश्चित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते.

मौजे सिरसो येथील पुनर्वसित गावठाणामध्ये नगररचना विभागाच्या नियमानुसार मंजूर अभिन्यास नकाशा प्रमाणे भूखंडाचे ईश्वरचिठ्ठी सोडत नुसार प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले. एकूण ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले आहे. यावेळी उमा बॅरेज प्रकल्पाचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, प्रकल्प यंत्रणेचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ उपविभागीय अभियंता अविनाश साल्पेकर तसेच आकाश उजवणे, श्री उकाळे, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी १८५ चौ.मिटर चे १४३, २७७.५ चौ.मि.चे २६, ३७० चौ. मि.चे ११४. ५५५ चौ.मि. चे २० तर ७४० चौ.मि चे दोन असे एकूण ३०५ भूखंड निश्चित करण्यात आले,अशी माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार यांनी दिली.