छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय तर्फे भव्य पशूलसीकरण शिबिराचे आयोजन

मीडिया वार्ता

१९ जून,मांडकी : औरंगाबाद जिल्यातील मांडकी येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना हर्सूल या अंतर्गत भव्य पशुलसिकरणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी, यादृष्टीने या शिबीराचे आयोजन केले होते. 

महाविद्यालयाचे विद्यार्थी अविनाश काळे,शैलेश बोरकर,विजय जगताप, रोहित जाधव, पवन काळे,कमलेश जाधव,ज्योती ठोंबरे,संस्कृती पडुळ,ऋतुजा वाळके,साक्षी वाघ, वैष्णवी शेळके, हर्षदा विश्वासू यांनी या लसिकरणाचे आयोजन केले होते. लसिकरणासाठी लाळ्या खुरकुत व फऱ्या या रोगांची लस जनावरांना देण्यात आली. एकूण २०० जनावरांना लसी देण्यात आल्या. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक श्रेणी-2 मधील डॉ.आर.जी. चव्हाण आणि डॉ.थोरात आणि डॉ.चेके यांनी लसीकरण करण्यासाठी मदत केली तर मांडकी गावचे सरपंच प्राची भेसार, उपसरपंच सुनील जाधव आणि सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here