आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन दिवसीय शैक्षणिक दाखले शिबिराचे आयोजन…

61

आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन दिवसीय शैक्षणिक दाखले शिबिराचे आयोजन…

हिरामण गोरेगावकर

कल्याण: जून महिना निघाला की सर्वच पालक तेसेच शालेय विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते ती म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळावा म्हणून अनेक प्रकारचे दाखले जमा करण्याची मग ते माध्यमिक किंवा उच्चमाध्यामिक किंवा पदवी प्रवेश शिक्षण घ्यायचं असेल ,आणि यासाठी लागणारे दाखले मिळवणे म्हणजे लोकांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागतात ,तरीही लोकांची काम वेळेवर होत नाहीत. अशातच कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात दोन दिवसीय शैक्षणिक दाखले शिबिराचे आयोजन केल्याने अनेक शेकडो लोकांना या संधीचा फायदा घेता आला.

आमदार गणपत गायकवाड हे जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कार्यतत्पर असतात हे त्यांनी त्यांच्या अनेक कामातून दाखवून दिलं आहे . शेकडो गरीब गरजू लोकांना एकाच ठिकाणी अशी व्यवस्था निर्माण केल्याने खूप साऱ्या लोकांना होणार त्रास वाचला कामही लवकर होऊ शकली .आणि अशातच लोकांनी आपल्याला या संधीचा लाभ घेता आला यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचे आभार मानले.