साहित्य कला सेवा मंडळाची सुरेल काव्यमैफल 

55

साहित्य कला सेवा मंडळाची सुरेल काव्यमैफल 

मीडियावार्ता

१८ जून, नागपूर: साहित्य कला सेवा मंडळ या नागपुरातील एका अग्रगण्य काव्यमंडळातर्फे दि १८/०६/२०२३ ला एक काव्यमैफिल पार पडली. त्यात अध्यक्ष स्थान मोहपा येथील माजी नगराध्यक्षा व कवयित्री सौ शोभा कौटकर यांनी भुषवले. तसेच सूत्रसंचालन सौ. निकीता गावंडे यांनी केले. या काव्यमैफिलीमध्ये कवी अंकुश शिंगाडे, राजेश कुबडे, सौ. वैशाली बोकाडे, श्रीमती सविता काळे, गणेश पांडे, रमेशचंद्र दिक्षीत, राजेश माहूरकर, राजू डहाके, शरयू वड्याळकर, पांडुरंग भोसले, देवीदास इंदापवार, सुधाकर पुंजे, दत्तू पौनीकर, पवन कोरडे, अनंत वेखंडे, बाळकृष्ण राऊत, हर्षाताई कोठेकर, रमेश बेलगे, सुधीर पुंजे, राजेंद्र बोकाडे, माला पारीसे, सौ सविता काळे, सौ इंदापवार इत्यादींनी आपापल्या रचना सादर केल्या. 

          श्री अंकुश शिंगाडे यांनी पावसाळा ही कविता सादर केली व शेतक-यांचे दुःख व्यक्त केले. श्री. रमेशचंद्र दिक्षीत यांनी ऑंखो पर बसी ऐनक सादर करुन कवी व श्रोत्यांची वेदना व्यक्त केली. सुधाकर पुंजे यांनी एक गझल सादर केली. गणेश पांडे यांनी बाप कविता सादर करुन बापाचं प्रेम व कळकळ व्यक्त केली. वैशाली बोकाडे यांनी एक गीत सादर केले. तसेच त्या गीतातून त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. राजेश माहूरकर यांनी एक विनोदी कविता सादर केली व श्रोत्यांना जणू हास्याचे लोटांगण घालावयास भाग पाडले. डॉ. पवन कोरडे यांनी गझल सादर केली. राजू डाहाके यांनी देव नाही अंतरात ही कविता सादर केली. दत्तू पौनीकर यांनी एक हिंदी रचना सादर केली.

शरयूताई वड्याळकर यांनी येत राहते लाट व जात राहाते लाट ही कविता सादर केली. व पावसा पावसा ये ही कविता सादर करुन श्रोत्यांना खिळवून ठेवले. हर्षाताई कोठेकर यांनी मनाच्या पोकळीत घेवून स्वप्नांना मी नभ हे पांघरले या ओळीची कविता सादर केली. राजेंद्र बोकाडे यांनी वह गलिया कैसे याद रखे ही हिंदी कविता सादर केली. बाळकृष्ण राऊत यांनी एक गीत आषाढीची वारी सादर केले. रमेश बेलगे यांनी एक अत्यंत चांगली रचना सादर केली. माला पारीसे यांनी एक गझल सादर केली. मंदार कौटकर यांनी वाटते की पुन्हा एकदा क्रांती करावी स्वातंत्र्य समता बंधुतेची शांती करावी या ओळीची कविता सादर केली. ती एक अतिशय दमदार कविता नव्या जगाची आस दाखविणारी कविता वाटली.

सुधीर पुंजे यांनी एक हिंदी रचना सादर करुन श्रोत्यांचे मन जिंकले. देविदास इंदापवार यांनी एक गीत सादर केले. तकदीर के रंग ही हिंदी रचना देवीदास इंदापवार यांनी सादर करुन श्रोत्यांच्या मनात नवीन उत्साह भरला. श्री गावंडे यांनी माझे माहेर पंढरी हे गीत सादर केली व सौ गावंडे यांनी छेडता त्याने ताण विसरलीस तू भान ही कविता सादर केली. 

            श्री राजेश कुबडे मंडळाचे अध्यक्ष, यांनी आधार ही कविता सादर केली. वडीलांवरील कविता. अतिशय गंभीर कविता सादर सादर करुन रसिकांच्या डोळ्यांना पाणी आणलं. यानंतर सर्वात शेवटी सौ. शोभा कौटकर यांनी अध्यक्षीय भाषण करुन कविसंमेलनाच्या माहिती दिली. त्यातच त्यांनी कविताही छानपणे सादर केली. शेवटी आभार प्रदर्शन झालं. आभार प्रदर्शन राजेश माहूरकर यांनी केले व कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचं आयोजन सौ. शरयू वड्याळकर यांनी केले होते. शेवटी त्यांनी खमंग नाश्ता देवून कार्यक्रमाची सांगता केली.