शिर्डी: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासनाच्या निर्णयामागे जनहित
संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
मो. नं.830896426
शिर्डी शहरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय शिवसेना भाजपा युती सरकारने नुकताच घेतला असुन जनहिताचे निर्णय घेणारे सामान्य माणसाला न्याय देणारे हे सरकार असुन शिर्डी परीसराच्या अर्थकारणाला हातभार लागावा सामान्य माणसाला नगर येथे जावे लागत असल्याने वेळ व पैसा दोन्ही खर्च होत होता तो आता वाचणार असल्याने जनहिताची काळजी घेणारे हे सरकार आहे असे मत शिवसेनेचे नगर जिल्ह्या प्रमुख कमलाकर कोते यांनी व्यक्त केले आहे
कोते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्खमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री मंत्री राधाकुष्ण विखे पाटील,
खा. सदाशिव लोखडे ,खा. सुजय विखे पाटील यांचा नेहमीच शिर्डी शहराला न्याय देण्यासाठी प्रयत्न राहीला आहे शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकाचा मोठा त्रास कमी होणार आहे नगर येथील कार्यालय कामकाजा साठी वेळ,पैसा,कष्ट मोठ्या प्रमाणावर वाया जात होते ते सर्व वाचणार आहे शिर्डी येथे विमानतळ,रेल्वे स्टेशन,राज्यभर बस व्यवस्था,समुध्दी महामार्ग अन् दळणवळण साधने चोवीस तास उपलब्ध आहे त्याच बरोबर जेवनाची व मुक्कामाची व्यवस्था असुन शहरा लगत हजारो एकर शेती महामंडळांची जमीन उपलब्ध असुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे समकक्ष कार्यालय सुध्दा सुरु करता येतील मध्यवर्ती ठिकाण आहे पाणी रस्ते लगत आहेत हे सर्व पाहाता शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय उत्तर नगर जिल्ह्यांच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी योग्य निर्णय असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले.