वाळवटी मराठी शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
✍️सचिन सतिश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
दिघी- श्रीवर्धन तालुक्यातील रा. जि.प वाळवटी मराठी शाळेमध्ये सोमवार दि. 16 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवागतांचे पावलांचे ठसे घेऊन व पुष्प देऊन त्यांची ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश, शूज व पायमोजे, पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचा समावेश देखील करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये विविध प्रकारे सजावट करण्यात आली होती त्यामुळे वातावरण उत्साही व प्रफुल्लित झाले होते. मुले विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद घेत होती. पालक समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक दिसून आला.
सदर कार्यक्रमास उपसरपंच रमीज आरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ रुपाली वाळवटकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक शाळेतील माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका असे विविध स्तरातून मान्यवर उपस्थित होते. श्री भास्कर पांगारकर श्री संदीप पाटील या शाळेतील शिक्षक वृंदांनी सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले.