नागरी समस्यांबाबत शिवसेना उद्धव बा. ठाकरे गटाकडून भिवंडी मनपा आयुक्तांना निवेदन

नागरी समस्यांबाबत शिवसेना उद्धव बा. ठाकरे गटाकडून भिवंडी मनपा आयुक्तांना निवेदन

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी शहरातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज गगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन देऊन शहरातील समस्यांचा पाढा वाचला. या शिष्टमंडळातील प्रशांत वसानी, सुधीर नांदुरडीकर, नितीन काठवले, शंकर खामकर, जमालुद्दीन मोमीन, नजीर शेख, मुजम्मील खान, शफीक अन्सारी, वसीम कुरेशी, शांताराम जाधव, विजय गायकवाड, चंदा बॅनर्जी, मंदा जावळे, वर्षा ठाकरे, मिरा भानुशाली, नौशेवा अन्सारी, ललित राऊत, लक्ष्मण हुंबारकर, मधुकर जाधव, विनोद आडे, बशीर इंडीकर, मनीष गीरी, प्रताप शिंदे सुयोग घैसास, दम्मशिला उबाळे उपस्थित होते. व चर्चेत भाग घेतला. सध्या रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे शहरात सुरू असून त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात रस्ते खोदल्याने नागरिकांना मनस्ताप सहन कराव लागत आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन तुटल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. तर अनेक भागात ड्रेनेज लाईनही लिकेज आहेत. स्वच्छता विभागाकडून साफसफाई होत नाही, कामवारी नदीवरील गणपती विसर्जन घाट दुरवस्थेत आहे. पाण्यावर जलपर्णी जमा झाली आहे. तर अनेक भागातून केमिकलयुक्त पाणी व ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे, ते त्वरित थांबवावे व नदीतील गाळ त्वरित काढण्यात यावा. वंजारपट्टी नाका, चाविंद्र रोड, वेताळ पाडा, कचेरीपाडा रोड व भिवंडीमधील सर्व वॉर्डातील रस्ते खोदकाम केल्यामुळे खराब अवस्थेत आहेते ते रस्ते डांबरीकरण करून घ्यावेत, तर अनेक गटारांवर चेंबरवरील झाकणे नसल्याने वाहनांचे अपघात होत असल्याच्या समस्या आयुक्तांसमोर मांडून त्या सोडवण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी केली. भिवंडी शहरासाठी सर्व सोयी सुविधा देण्याचे आयुक्त अनमोल सागर यांनी मान्य करून सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख मनोज गगे यांनी दिली आहे.