अपूर्व अशी अपूर्वा – कवी अरुण निकम

40

“अपूर्व अशी अपूर्वा.!”

अपूर्वा, अपूर्वा, अपूर्वा, 

तुझ्यासम गुणवंत 

लेक मिळो सर्वा,

केलास अभ्यास, दिन रात 

वेळ न दवडलास, 

खेळण्या , बागडण्यात,

न लुडबुड केलीस, स्वैtपाकघरात,

फक्त लक्ष घातलेस, अभ्यासात.!

 

अपूर्वा, अपूर्वा, अपूर्वा, 

दैवी देणगी तुला, 

 हसर्‍या चेहर्‍याची, 

लाघवी बोलण्याची 

अन आपुलकीच्या वागणूकीची,

तत्कारण रुग्ण आढेवेढे न घेता, उपचार घेई खुशीने.!

 

अपूर्वा, अपूर्वा, अपूर्वा, 

 निसर्गाने दिली, 

शारीरिक उंची बेताची जरी, 

पण उपचाराने तुझ्या, 

घेतलिय उंच भरारी,

 म्हणुन तर मिळालीय,

 अनेकांना जगण्याची उभारी.!

 

अपूर्वा, अपूर्वा, अपूर्वा,

तुझ्या अंगभूत गुणांनी,

अन दैवी आशीर्वादाने, 

पायघड्या धनाच्या, अंथरल्या जातील, 

तुला वैभव प्राप्त होऊन, 

तु सुख, समाधानात न्हावून निघशील.! 

 

पण बेटा एक विनंती आहे, 

तुझ्या व्यस्त वेळेत, थोडा वेळ काढून, कफल्लक रूग्णांचा मोफत उपचार केल्यास, 

ते समाधान तुला परमोच्च आनंद देऊन जाईल. !

परमोच्च आनंद देऊन जाईल.!!

परमोच्च आनंद देऊन जाईल.!!!

 

कवी – अरुण निकम

मो: 9323249487