अखी बोरीवली हादळली, भररस्त्यात वकिलावर तलवारीचे सपासप वार.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.19 जुलै;- मुंबईच्या उपनगर बोरीवलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 10 ते 15 जणांच्या ग्यागने बोरिवलीत भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने एकच हाहाकार माजला होता.
10 ते 15 जणाच्या आरोपीच्या टोळी ने भररस्त्यात वकिलावर तलवारीने सपासप वार करून पळाले. हे गुंड तलवारीने वार करत असताना एकाने याच्या व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सत्यदेव जोशी असं जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307, 326, 324, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.