*चंद्रपुरच्या भ्रष्ट्राचारी महापौर सौ राखिताई कंचरलावार राजीनामा द्या.* आप चंद्रपूरचे इंचार्ज तथा संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर यांची मागणी.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
जिल्हा प्रतिनिधी:- आज चंद्रपुर महानगर द्वारा चंद्रपुर महापालिकेच्या महापौर सौ राखिताई कंचरलावार यांनी *कोविड19/ करोना महामारीच्या काळात* जनतेच्या हिताच्या, सुरक्षिततेच्या कामांना प्राथमिकता न देता असलेल्या चारचाकी वाहनाचा उपयोग न करता आपल्या चैनीसाठी महापालिका कोषातून १० ते १२ लाखाचे वाहन तर खरेदी केलेच ,पण खरेदी केलेल्या वाहनाचा क्रमांक विशिष्ट,खास असावा म्हणून *जनतेने घाम गाळून आपल्या मालमत्ता कराच्या व इतर कराच्या रूपाने भरलेल्या पैशावर डल्ला मारत नवीन घेतलेल्या वाहनाच्या RTO क्रमांकासाठी रुपये ७०,००० खर्च केले. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी नव्हे तर काय ?* असा प्रश्न चंद्रपुरकरांना पडलेला आहे.
आणि म्हणून आज चंद्रपुर महानगर द्वारा चंद्रपुर मनपा तील भ्रष्ट्राचार प्रशासनिक अधिकारी यांचेवर ताशेरे ओढण्यात आले. व *चंद्रपुर महापालिका समोर श्री सुनील रत्नाकर भोयर यांचे नेतृत्वात आधी रुपये ७०,००० मनपा कोषात भरा महापौर चंद्रपुर राजीनामा द्या.* अशा घोषणा देत आंदोलन केले. आणि जर या मागण्या मान्य होत नसेल तर *आम आदमी पार्टी जनतेला जागवून मनपा च्या समोर डेरा आंदोलन उभारेल.* याची जिम्मेदारी महापौर व मनपा प्रशासनाची राहील. असा इशारा देऊन याच आशयाचे निवेदन चंद्रपुर मनपा आयुक्त यांना सोपविण्यात आले. आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनाला यशस्वी होण्यासाठी चंद्रपुर महानगरचे श्री दिलीप तेलंग,श्री योगेश आपटे सहसंयोजक, शहर श्री अशोक आनंदे कोशाध्यक्ष,श्री अजय डुकरे शहर सहसचिव,श्री वामनराव नांदूरकर, सोशल मिडिया हेड श्री राजेश चेडगूलवार,श्री राजू कुडे शहर सचिव ,श्री सिकंदर सांगोरे सहसंयोजक, श्री मधुकरराव साखरकर, श्री बबन कृष्णपल्लीवार,श्री आश्रफभाई ,श्री मयूर राईकवर ग्रामीण युवा संयोजक,श्री सुनील मुसळे ग्रामीण जिल्हा संयोजक,श्री संतोष दोरखंडे ग्रामीण सचिव, श्री हिमायून अली चंद्रपुर विधानसभा,श्री राजेश बेले ग्रामीण संघटनमंत्री, श्री संदीप तुरक्याल, श्री शंकर धुमाळे ऑटो युनियन चंद्रपुर जिल्हा, श्री अंमजदभाई ,श्री पोटे साहेब,आप बल्लारपूर टीम,आप भद्रावती टीम ,आप घुघुस टीम, इत्यादींनी भरपूर परिश्रम केले. असे आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर कळवीत आहे.