*गोंडपीपरी तालुक्यात वैध देशी दारूची अवैध रीत्या नदिपात्रातुन होते वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्यात आली देशी भट्या बार सूरू झाल्या दाम दुप्पट देउन विकत घेणारी दारू आज स्वस्त दरात मीळत आहे त्यामुळे तळिरामात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशातच कोरोणामूळे दारुची दुकाने हे सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले मात्र सुट्टी च्या दिवसातही मागील दाराआड दारू विक्री चालूच असल्याचे निदर्शनास येत आहे
तालुक्यात काही भट्टिमालक राजरोसपणे वैध देशी दारू अवैध रीत्या माणसे लाउन कधी दुचाकी तर कधी रात्रिच्या सुमारास चार चाकीने नंधवर्धन दरुर अडेगाव मार्गाने नदीपात्रातुन थेट परराज्यात वैध दारुची अवैध दारू तस्करी सुरूच आहे मात्र पोलिस प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याने पोलिस विभागाच्या कार्यपद्धती वर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे
शनीवार व रवीवारला देशी विदेशी दारू दुकानात मागील दारातुन तळीरामाना सहजपणे दारू मिळत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे