वर्धा जिल्हातील किन्हाळा गावातील ग्रामस्थांना स्थाही पट्टे दया, कामगार नेते डॉ. उमेश वावरेची मागणी.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा,दि.19 जुलै:- वर्धा जिल्हातील समुद्रपुर तालुक्यात येणा-या किन्हाळा ग्राम पंचायतने दि,21 जुलै 2020 ला सर्वानुमते एक ठराव पारीत केला त्या ठरावाच्या अनुषगाने ग्राम पंचायतच्या हद्दीत येणारी गावठान जमीन असून त्या जमीनीवर गावातील नागरीकानी अतिक्रमण झालेले आहे.
शासन प्रत्येक कुटुंबांला घर बाधण्यासाठी आर्थिक सहकार्य करत आहे. पण ही जमिनीवर शासन दफ्तरी नावावर नसल्यामुळे आज अनेक कुटूंबाना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सदर गावठान जागेवर प्रत्येकास एक समान मोजून तेथील नागरिकाना प्लांट पाडून देण्यात यावे. आणि सदर अर्जदाराना प्रतंप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असून सदर ग्राम पंचायत याचा कडे दुर्लक्ष करत आहे.
हि बाब 15 दिवसाच्या आता निकाली काढावी अन्यथा सर्व गावकरी आमरण उपोषनाला बसतील असा ठळक ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कामगार नेते डॉ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत जिलाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना, मनिष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, जिवन उरकुडे, देवेन्द्र त्रिपल्लीवार प्रणय पाटील, नुतन राठोड़, दिलीप बालक, अतीश माडवे, सुरेश दुधकोहके, निखिल बोबडे, मंगेश पाटील, प्रणय बावणे,तुषार पाटील, सचिन ठाकरे, गजानन नागेशे, मंगला वंतारी, कचरू बावणे, मालता बावणे, संजय बगडे, जितेन्द्र चौधरी, इदु वंतारी, सरला शेन्डे, विलास गेडाम, शिला गेडाम, संगीता बावणे, यशोदा दुधकुरे, संविता नागोसे, राहूल पाझारे, सुयोग्य पाटील, रोहीत झगडे, नागेश पाटील, रोशन पाटील इत्यादि ग्रामस्थ उपस्थित होते.