नागभिड नगरपरिषद श्रेञातील मौजा बाम्हणीत पुर परिस्थिती निर्माण, प्रहार जनशक्ती कडुन पाहणी
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड –आज दिनांक 18/07/2022 रोजी नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील नागपूर रोड वरील बामणी येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि नगरपरिषद क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना बोलवून पहाणी केली .
तसेच त्या क्षेत्रामध्ये नगरपरिषद द्वारे कोणतीही नाली त्या एरिया मध्ये बांधलेली नाही म्हणून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साम्राज्य दिसून येत आहे
यावेळी बामणी येथील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये काय करावं काय नाही असा बामणीकरांना प्रश्न पडलेला आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड चौकशी करताना लोकांच्या अनेक समस्या नगरपरिषद बामणी येथे पाच वर्षां मध्ये नगरपरिषद नी कोणतीच कामे केलेली नाहीत, असं पाहणी करताना बामणी करांनी कळवलेलं आहे. कुणाचे घरकुल चे प्रश्न आहेत कुणाचे रोड चे प्रश्न तर कुणाचे स्वच्छतेचे प्रश्न असे अनेक प्रश्न आम्हाला त्या गावातून ऐकायला मिळालेले आहेत.
आणि अशावेळी नगरपरिषद ला तात्काळ बोलून जे सी पी नी ज्या नाल्याच्या ठिकानातुन पाणी गावात निर्माण होत आहेे, योग्य पर्याय करून ती पाणी पायवाटेने कसं मार्गाला लावण्याचे काम तातडीने सुरू आहे.आणि योग्य पर्याय न झाल्यास त्या बामणी करांना जा भागांमध्ये पुर आलेले आहे या भागातल्या नागरिकांना जुनी ग्रामपंचायत अंगणवाडी येथे नेण्याची सुविधा पण केली आहे म्हणून बामणी करांना मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहारसेवक निलेश डोमळे वृषभ खापर्डे अक्षय खोब्रागडे नितेश देशमुख आणि ईतर प्रहारसेवक उपस्थित तसेच नगरपरिषद चे पदाधिकारी उपस्थित होते.