जगप्रसिध्द अजिंठा बुध्द लेणी येथे भारतीय बौध्द महासभेच्या जामनेर शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा संपन्न

मनोज एल. खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्यूज

मोबाईल नंबर- 9860020016

फर्दापुर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, गुरु पौर्णिमाचे औचित्य साधून भारतीय बौध्द महा सभा जळगाव पुर्व अंतर्गत तालुका जामनेर शाखा शाखेने दिनांक: १३/०७/२०२२ रोजी जगप्रसिद्ध अजिंठा बुद्धभूमीमध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा व मालिकेचे प्रथम प्रवचन संपन्न झाले

या जगप्रसिध्द अजिंठा बुध्द लेणीत भारतीय बौध्द महासभेच्या शिस्ती नुसार धम्मवीधी व प्रवचन हा लेणीच्या हजारो वर्षाच्या जागतिक इतिहासात एक नविन पान जोडल्यासारखाच आहे

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जामनेर कार्यकारणी व समस्त बौध्द अनुयायी आजच्या या ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आज दिनांक:१००/०७/२०२२ रोजी दु. १२.३० ला लेणीत दाखल झाले.लेणीच्या स्थानिक प्रशासनाच्या प्रवेश प्रक्रीया पुर्ण करुन मुख्य लेणीत चार नंबरच्या सर्वात विशाल लेणीत.जिथे पुजास्थळी तथागत बुद्धांच्या ६ महाकाय मुर्त्या आहेत ज्या की, अष्टभयापासुन संरक्षण करीत असल्याचे दिसते अशा संथागारात दु २ वाजता वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन सोहळा सुरु करण्यात आला..बुध्द धम्माचे पवित्र ग्रंथ विनय पिठक, अधिधम्मपिठक व सुत्तपिठक प्रत्यक्ष बुध्दमुर्ती समोर ठेवुन कार्यक्रम सुरु झाला…या मंगल प्रसंगी भारतीय बौध्द महासभा जळगाव पुर्वचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जळगाव संस्कार विभाग प्रमुख सुशिलकुमार हिवाळे यांची उपस्थिती होती..जामनेर शाखेचे विद्यमान अध्यक्ष वसंतदादा लोखंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले, तसेच सोयगांव तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य तथा जेष्ठ समाजसेवक विजय तायडे त्यांच्या समवेत बौध्दाचार्य राजेश इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन जामनेर ता. महासचिव नंदबोधी तायडे यांनी केले.. ता.शाखेचे संस्कार सचिव माणिकराव लोखंडे यांनी त्रिशरण पंचशिल दिले. प्रसंगी संस्कार विभागप्रमुख, सुशिलकुमार हिवाळे, तालुका अध्यक्ष, वसंतदादा लोखंडे, संस्कार सचिव माणिक लोखंडे, सरचिटणीस नंदबोधी तायडे, समाजसेवक विजय तायडे यांनी शुभेच्छापर प्रवचने दिली व आशिर्वाद गाथेने हा ऐतिहासिक मंगलमय वर्षावास उद्घाटन सोहळा एकुण 50 बौद्ध उपासक उपासिका यांच्या साक्षीने संपन्न झाला.

ख-या अर्थाने बुध्दभुमीच्या कुशीतुन धम्मप्रचार व प्रसार आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत तालुकाभरात गतिमान होणार आहे यावेळी पत्रकार प्रविण तायडे, शरद दामोधर रमेश दामोधर, वसंत पगारे,अनिल लाठे, 

देविदास मेढे (ता.संघटक)

 भगवान ब्राम्हणे,संघटक

अर्जुन मगरे(ता.संघटक)

भावराव तायडे(ग्रामशाखा अध्यक्ष रांजणी)

बारसु सपकाळे (ग्राम शाखा रांजणी)

समाधान मगरे (बौद्धाचार्य)

राजेश इंगळे(माजी श्रामणेर)

शरद वाघ(ग्राम शाखा अध्यक्ष)

किसन लोखंडे(माजी श्रामणेर)

 त्याचप्रमाणे 

शांताराम मगरे, वसंत सुरडकर,प्रेम सपकाळे, विजय वाघ (रांजणी)

मनोज सुरवाडे,संदीप सुरवाडे राहुल सुरवाडे जळांद्री, विजय सुरवाडे, . प्रविण सुरवाडे, सागर सुरवाडे, अरुण पाटील, (जळांद्री), अनिल वाघ,भागदरा गजमल इंगळे,राजु इंगळे, पिंपळगाव तसेच

महिला उपासिका  

अनिताताई सुरवाडे, गयाबाई सुरवाडे, सरुबाई सुरवाडे, सविता इंगळे, सुप्रिया इंगळे, रीना तडवी, शितल सोनवणे, रंजिताताई इंगळे, वंदनाताई खराटे,दुर्गाबाई सोनवणे, इंदुबाई सोनवणे, नम्रता खराटे, शंकुतला तायडे, कस्तुराबाई सोनवणे (पिंपळगाव) आदींचा मोठा सहभाग होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here