सरळसेवा भरती 2023 ची परीक्षा शुल्क कमी करण्यात यावी, अशी मागणी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांनी केली…बिरसा फायटर्सचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना निवेदन

प्रकाश नाईक

जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार

मो. 9511655877

नंदुरबार : सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करणेबाबत असे निवेदन गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली तसेच या मागणीचे निवेदन शहादा तालुक्यातील टिमने सुद्धा केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षाद्वारे विविध विभागात भरती सुरू केली आहे. त्यात परीक्षा शुल्क (फी) १००० रु इतकी आहे.तरी परीक्षा शुल्क (फी ) कमी करण्यात यावे. कारणं की तलाठी, वनरक्षक भरती व इतर कुठल्याही प्रकारच्या भरती प्रक्रियेत १००० रु इतकी रक्कम शुल्क असल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अभ्यास करणारी अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातील असुन त्यांना शुल्क (फी) भरणे परवडत नाही.राज्य शासना अंतर्गत विशेष भरती प्रक्रिया राबविली जाते.त्यात परीक्षा शुल्क अधिक असल्याने ती परीक्षा शुल्क (1000 रुपये) गरीब कुटुंबातील विध्यार्थ्यांना न परवडणारी आहे.त्यासाठी शासनाकडे विनंती करण्यात येते की महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत 2023 मधील सर्व विभागातील होणाऱ्या परीक्षा शुल्क (फी) कमी करुन परीक्षा शुल्क मध्ये सवलत देण्यात यावे.

गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे रात्रंदिवस अभ्यास करतात आणि शुल्क अधिक असल्या कारणाने अगदी तळमळीने अभ्यास करणारे गरीब कुटुंबातील मुले ऐन परीक्षेच्या वेळी अधिक शुल्क असल्यामुळे मागे पडतात. जेव्हा राज्य सरकारने विषेश भरती प्रक्रिया सुरू करते तेव्हा ते मागे पडतात. असे होऊ नये. व गरीब कुटुंबातील मुले परीक्षे पासून वंचित राहू नये. म्हणून परीक्षा शुल्क कमी करुन 200 रुपये इतके परीक्षा शुल्क करण्यात यावे व गरीबी विद्यार्थयांना भरतीचा लाभ घेता यावे अशी विनंती बिरसा फायटर्स संघटनातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here