48 तासापेक्षा जास्त पडलेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले ; अनेक विभागात पुरसदृश्य परस्थिती

संतोष आमले

रायगड ब्युरो चीफ

मो: 9220403509

गेल्या 48 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भितीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले.

गेल्या 48 तासापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपून काढलेे आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ग्रामीण भागामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येक ठिकाणी पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासकीय अधिकारी व महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपटा, डोळघर येथील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले. तसेच काही गावामध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली असल्याने त्यांनी सुद्धा आपल्या नातेवाईकांना कळविले आहे. या पावसाचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. पनवेल शहरातून जाणार्‍या उड्डाण पुलावरुन देखील पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले असून सर्वच ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने आपापल्याच घरी राहणे पसंत केले आहे. 

पनवेल उरण मधील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर कित्येक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस व अग्नीशमन दल सतर्क झाले आहेत. त्याचप्रमाणे गाढेश्‍वर नदी तुडूंब भरुन वाहत आहे. रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. एकंदरीत या पावसामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here